छत्रपती संभाजीनगर : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या प्रवेशावरून उद्धवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हे पुन्हा आमने-सामने आले आहेत. खैरे यांनी जाधव यांच्या प्रवेशाला कडाडून विरोध दर्शविला; तर दुसरीकडे दानवे यांनी पक्षप्रमुख ठाकरे यांच्या निर्देशाने हा प्रवेश होईल, अशी भूमिका घेतली आहे.
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वी उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची भेट घेऊन चर्चा केली हेाती. तेव्हापासून जाधव यांच्या उद्धवसेनेतील प्रवेशाची चर्चा सुरू झाली. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जाधव यांनी खैरेंविरोधात निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत खैरे यांचा पराभव झाला होता. तेव्हा त्यांनी त्यांच्या पराभवाला जाधव यांना कारणीभूत ठरवले होते. तेव्हापासून जाधव यांच्यावरील खैरे यांचा राग कायम आहे. यातूनच त्यांनी आता जाधव यांच्या पक्षप्रवेशाला जाहीर विरोध दर्शविला आहे; तर दुसरीकडे दानवे यांनी मात्र पक्षप्रमुखांचे आदेश त्यांच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
नेत्यांचे वाद चव्हाट्यावरदरम्यान, जाधव यांनी मुंबईत जाऊन पक्षप्रमुख ठाकरे यांची भेट घेतली. यामुळे जाधव यांचा उद्धवसेनेत प्रवेश होणार असल्याचे मानले जात आहे. खैरे आणि दानवे हे पक्षातील नेते असले तरी कायम त्यांच्यात कुरघोडीचे राजकारण पाहायला मिळत असते. आता जाधव यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने पुन्हा उभय नेत्यांमध्ये पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत.
Web Summary : Uddhav Sena leaders Danve and Khairnar clash over Harshvardhan Jadhav's entry. Khairnar opposes, citing past election rivalry. Danve awaits Thackeray's orders, revealing internal party disputes.
Web Summary : हर्षवर्धन जाधव के प्रवेश को लेकर उद्धव सेना के नेता दानवे और खैरे में टकराव। खैरे ने विरोध किया, जबकि दानवे ठाकरे के आदेश का इंतजार कर रहे हैं, जिससे पार्टी में अंदरूनी कलह उजागर हो गई।