शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

भाजप बंडखोरामुळे शिंदेसेनेची वाढली डोकेदुखी; वैजापूरात बोरणारे-परदेशी- जाधव तिरंगी लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 16:30 IST

विकास कामांवरील चर्चेऐवजी आरोप-प्रत्यारोपच होऊ लागले

- बाबासाहेब धुमाळवैजापूर : वैजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाने निलंबित केलेले अपक्ष उमेदवार एकनाथ जाधव यांनी जोरदार प्रचार सुरू केल्याने शिंदे सेनेचे उमेदवार आमदार रमेश बोरनारे यांनी डोकेदुखी वाढली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. दिनेश परदेशी हे महायुतीतील दुफळीचा फायदा घेण्यासाठी सरसावले आहेत.

वैजापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिंदे सेनेचे उमेदवार आमदार रमेश बोरनारे, महाविकास आघाडीकडून उद्धव सेनेचे उमेदवार डॉ. दिनेश परदेशी आणि भाजपचे बंडखोर उमेदवार एकनाथ जाधव यांच्यात तिरंगी लढत आहे. या निवडणुकीत विविध कारणांमुळे होणारे मतविभाजन निर्णायक ठरणार असून या निवडणुकीत विकास कामांवर चर्चा होण्याऐवजी उमेदवार एकमेकांवर आगपाखड करताना दिसत आहेत. महाविकास आघाडी व महायुती एकमेकांच्या सत्ता काळातील बऱ्या-वाईट कामांचा पाढा वाचत आहेत. त्यातून तालुक्याचा विकास आणि रोजगार या मुद्द्यावर बोलण्याऐवजी एकमेकांचे वाभाडे काढले जात आहेत.

आमदार बोरनारे यांना गेल्या निवडणुकीत मिळालेल्या मतानुसार ही निवडणूक तारेवरची कसरत ठरत आहे. माजी आमदार आर.एम. वाणी यांच्या हयातीत बोरनारे यांच्यासाठी डॉ. दिनेश परदेशी व एकनाथ जाधव या दोघांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह महायुतीचा धर्म पाळत एकनिष्ठेने काम केले होते. परदेशी यांनी गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार निवडणुकीत माघार घेतली होती. यंदाही महायुतीचा हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्यामुळे परदेशी यांनी निवडणुकीच्या तोंडावर उद्धव सेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली. तर भाजपाकडून इच्छुक एकनाथ जाधव यांनी बंडखोरी केल्याने बोरनारे यांची डोकेदुखी वाढली आहे. नगरपालिकेत गेली २५ वर्षे एकहाती सत्ता असलेले परदेशी यांनी बोरनारे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. मतदारसंघात ३ हजार कोटी रुपयांची विकासकामे केल्याकडे बोरनारे यांनी मतदारांचे लक्ष वेधले आहे. नारंगी मध्यम प्रकल्पासाठी पालखेड डाव्या कालव्याचे रुंदीकरण, रस्ते, पाणीपुरवठा, समाज मंदिरे, सामाजिक सभागृह अशी लोकप्रतिनिधींची कामे केल्याचा त्यांचा दावा आहे, तर विरोधकांकडून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे मतदारसंघाच्या तिंरगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

जाधव यांनी बोरनारे यांचा सुरू केला पिच्छायंदाची विधानसभा निवडणूक आपली शेवटची निवडणूक असल्याचे भाजपाचे अपक्ष उमेदवार एकनाथ जाधव यांनी जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती; परंतु महायुतीत ही जागा शिंदेसेनेकडेच कायम राहिल्याने जाधव हे कमालीचे दुखावले. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक वैयक्तिक पातळीवर घेतल्याचे दिसत आहे. ज्या गावामध्ये महायुतीचे उमेदवार रमेश बोरनारे यांच्या सभा होत आहेत, त्याच गावात त्याच ठिकाणी काही वेळानंतर किंवा दुसऱ्याच दिवशी ते सभा घेत आहेत. त्यामुळे त्यांनी बोरनारे यांचा एक प्रकारे पिच्छाच सुरू केल्याची चर्चा आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकvaijapur-acवैजापूर