शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

'सावधान, एक महिला तुम्हाला जीवे मारणार'; शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारेंना निनावी पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 15:53 IST

पोलीसांनी पत्राची दखल घेतली असून चौकशी सुरू केली आहे.

वैजापूर - वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांना ठार मारण्यासाठी काही लोकांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका महिलेची मदत घेतली असल्याचे निनावी पत्र त्यांच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी प्राप्त झाले.या घटनेची माहिती वैजापूर पोलीसांना देण्यात आली असून चौकशी सुरू केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांनी दिली.

या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. एका अनोळखी इसमाने २८ मार्च रोजी पत्र टाईप करून आमदार रमेश बोरनारे यांच्या संपर्क कार्यालयाच्या पत्त्यावर हे पत्र पाठवले होते.हे पत्र गुरूवारी (१३ एप्रिल) रोजी बोरनारे यांच्या कार्यालयात प्राप्त झाले. सविता महेंद्र सांळुके ( रा आळसुंदे ता कर्जत) या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या महिलेची तुम्हाला ठार मारण्यासाठी काही लोकांनी मदत घेतली असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पत्राचे तालुक्यात तीव्र पडसाद उमटले असून तर्कवितर्काना उधाण आले आहे. पोलीसांनी पत्राची दखल घेतली असून चौकशी सुरू केली आहे.ही धमकी कुणी दिली .हे अद्याप समजू शकले नाही.

आमदार बोरनारे आणि वाद

शिवसेना फुटल्यानंतर आमदार रमेश बोरनारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. ही घटना विधानसभा मतदार संघातील काही कार्यकर्त्यांना पटली नाही.त्यांचेवर खोक्याचा आरोप झाला.तसेच आमदारकी काळात त्यांनी मोठी माया कमावल्याचाही आरोप होत आहे.त्यांच्या कुंटुबियात देखील कलह आहे. त्यांच्या भावजयीने देखील त्यांचेवर अनेक वेळा गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. महालगाव येथे आदित्य ठाकरे यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचा देखील त्यांचेवर आरोप झाला आहे.त्यामुळे अनेक कारणांनी बोरनारे वादात सापडले आहेत.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद