शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे सरकारने थांबविली ४०० कोटींची जलसंधारणाची कामे; अधिकारी, कंत्राटदार हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 13:12 IST

सिमेंट, कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या कामांचा समावेश

- विकास राऊतऔरंगाबाद : राज्यातील शिंदे सरकारने जिल्ह्यातील सुमारे ४०० कोटी रुपयांची जलसंधारणाची कामे थांबविण्याचे आदेश ८ जुलै रोजी जारी केले आहेत. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडील प्रत्यक्ष सुरूवात न झालेल्या कामांच्या सर्व स्तरावरील निविदा रद्द करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. यात सिमेंट व कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या कामांचा मोठ्या प्रमाणात समावेश असून, त्या कामांच्या निविदा अंतिम होण्याच्या अवस्थेत असतानाच सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे अधिकारी व कंत्राटदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

महाविकास आघाडी सरकारने जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यात अध्यादेश काढण्याचा आणि कामांना मंजुरी देण्याचा सपाटा लावला होता. ३० जूननंतर सत्तांतर नाट्य झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीतून होणारी सर्व कामे तूर्तास थांबविली. तसेच प्रशासकीय पातळीवरील बदल्यांनाही ‘ब्रेक’ लावला. सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे देखील रोखली. त्यानंतर शुक्रवारी जलसंधारणाच्या निविदा थांबविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे बंधाऱ्यांची अनेक कामे वेळेत होण्यात अडचणी येणार असून, जुन्या दराने जी कामे मंजूर झाली आहेत व त्यांचे कार्यादेश देण्याची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे, त्या कामांना कधी सुरूवात होणार, असा प्रश्न आहे. या खात्याचे माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या काळातील १ हजार कोटींची स्पील ओव्हर (शिल्लक कामे) आहेत. त्या कामांचे काय होणार, यावरूनही अनेकांची धाकधूक वाढली आहे.

सर्वच तालुक्यांत कमी - अधिक कामेजिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत कमी-अधिक कामे आहेत. त्यात कन्नड तालुक्यातील ८० कोटी, वैजापूर तालुक्यातील ५० कोटी, सिल्लोडमधील ५० कोटी, पैठण आणि फुलंब्री तालुक्यातील सुमारे १०० कोटींची तर उर्वरित औरंगाबाद, गंगापूर-खुलताबाद, सोयगाव तालुक्यातील १२० काेटींच्या कामांचा समावेश असू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. ही कामे थांबविण्याचे आदेश येताच, बहुतांश कंत्राटदारांनी टेंडर क्लार्कला फोन करून कार्यादेश, निविदांची काय स्थिती आहे, याची विचारणा केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणी