शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

शेवगा २५०, गवार १२० रुपये किलो; आता काय, पत्ताकोबी खाऊन दिवस काढायचे काय?

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 27, 2024 14:15 IST

छत्रपती संभाजीनगर : मागील महिनाभरात भाज्यांच्या भावाने शंभरी पार केली आहे. सर्वांना आवडणाऱ्या शेवग्याच्या शेंगा किलो खरेदी केल्या तर ...

छत्रपती संभाजीनगर : मागील महिनाभरात भाज्यांच्या भावाने शंभरी पार केली आहे. सर्वांना आवडणाऱ्या शेवग्याच्या शेंगा किलो खरेदी केल्या तर चक्क २५० रुपये मोजावे लागत आहेत. गवार, फुलकोबी, सिमला, दोडके खरेदी करायचे तर प्रत्येक भाजीसाठी १०० रुपयांची नोट द्यावी लागत आहे. सध्या सर्वात स्वस्त भाजी म्हणजे पत्ताकोबी ३० रुपये किलोने मिळत आहे. आता बोला...पत्ताकोबीची भाजी खाऊन दिवस काढायचे का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

भाज्यांचे भाव (प्रति किलो)भाजी दर१) कारले--- १०० रुपये२) चवळी--- १०० रुपये३) गवार--- १२० रुपये४) वांगे---१०० रुपये५) दोडके---१०० रुपये६) शिमला मिरची---१०० रुपये७) भेंडी---१०० रुपये८) फुलकोबी--- १०० रुपये९) शेवग्याच्या शेंगा---२५० रुपये१०) टोमॅटो--- ८० रुपये

पहिल्यांदाच मेथीच्या भावात शेपूभाज्याचे भाव वाढले तसेच पालेभाज्यांचे भावही वधारले आहेत. पालेभाज्यात सर्वात जास्त भावात विकली जाणारी मेथी सध्या ३० रुपये गड्डी विकत आहे. एवढेच नव्हे तर शेपूही ३० रुपयांना मिळत आहे. पहिल्यांदाच शेपू मेथीच्या भावात विकत आहे. पालक, चुका, तांदुळजा या भाज्या २० रुपयांना मिळत आहेत.

कोथिंबीर भेला ८० रुपयांनाकोथिंबिरीचा मोठा भेला ८० व छोटी गड्डी ३० रुपयांना आहे. अशीच परिस्थिती राहिली तर कोथिंबीरही सिमला मिरचीच्या भावात म्हणजे १०० रुपयाला विकली तर नवल वाटायला नको.

कांदा, बटाट्यावर भरभाज्या महाग झाल्या आहेत. त्यापाठोपाठ कांदा व बटाट्याचे भाव वाढले आहेत. सध्या कांदा ४० रुपये तर बटाटा ४० ते ५० रुपये किलो मिळत आहे. अनेक ग्राहकांचा कांदा व बटाटा विकत घेण्यावर भर आहे.- सोमनाथ वाघ, भाजी विक्रेता

भाज्या खरेदी कराव्याच लागतातभाज्या कितीही महाग झाल्या तरी खरेदी कराव्या लागतातच. आधी ५० रुपयात किलोभर मिळणारी भेंडी आता १०० रुपयात मिळत आहे. मुलांना भेंडीची भाजी आवडते तसेच कांदा व बटाट्याची भाजी आवडत असल्याने त्या खरेदीवरच आमचा भर आहे.- सायली जोशी, गृहिणी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजारvegetableभाज्या