शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरातील 'ती' तोतया IAS महिला १० महिन्यांपासून पाकिस्तानी क्रमांकांच्या संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 13:55 IST

गृहमंत्र्यांची ओएसडी नावाने सेव्ह मोबाइल स्विच ऑफ; केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या नावे लेटरहेड, १९ कोटी व ६ लाखांचे धनादेश जप्त

छत्रपती संभाजीनगर : सहा महिन्यांपासून शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य करणारी तोतया आयएएस महिला अधिकारी कल्पना भागवत ही पाकिस्तानच्या अफगाण ॲम्बॅसी, पेशावर कँटॉनमेंट बोर्ड, झरदारी सर वाईफ, अफगाणिस्तान ॲम्बॅसी, मुजीब भाई, झरदारी सर, मोहम्मद रजा व नक्वी अशा ११ क्रमांकांशी दहा महिन्यांपासून संपर्कात होती. पोलिस तपासात ही धक्कादायक बाब समजली. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी या ११ क्रमांकाचा तपास सुरू केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

रविवारी कल्पनाला सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अतुल येरमे, सहायक निरीक्षक योगेश गायकवाड यांनी बनावट कागदपत्रे आढळल्याने अटक केली. तपासात तिचे अफगाणिस्तानचा नागरिक व भारतात व्यावसायिक म्हणून वास्तव्यास असलेल्या मोहम्मद अशरफ खिल याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे समजले. त्यानंतर केंद्रीय गुप्तचर यंत्रणांसोबत दहशतवादविरोधी पथकाने तपासात उडी घेतली. बुधवारी कल्पनाच्या पहिल्या पोलिस कोठडीची मुदत संपली. देशविघातक कृत्याचा संशय बळावल्याने पोलिस निरीक्षक येरमे, सहायक निरीक्षक योगेश गायकवाड, सहायक फौजदार सुभाष शेवाळे, अंमलदार दीपक देशमुख, संदीप जाधव, अविनाश पांढरे यांच्या पथकाने तिला कडेकोट बंदोबस्तात दुपारी न्यायालयात हजर केले.

वकिलाला म्हणते, ‘पाचपट फी देते’अर्धा तास पोलिस, सरकारी वकिलांसह आरोपींच्या वकिलांनी १२ मुद्दे मांडले. न्यायालयाने तिला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कल्पनाला न्यायाधीशांनी बाहेर थांबण्यास सांगितले. तेव्हा कल्पनाने न्यायालयाच्या आवारात पोलिसांशी हुज्जत घातली. शिवाय वकिलाला ‘तुम्हाला मी पाचपट फी देते, मला पत्रकार परिषद घ्यायची आहे’, असेही बोलून दाखवले.

या मुद्द्यांमुळे तपास गंभीर वळणावर- मोहम्मद अशरफ खिलचा भाऊ गालिफचा व्हिसा नाकारण्यात आला होता. त्यानंतरही त्याच्या कुटुंबाच्या पासपोर्ट व व्हिसाचे स्क्रीनशॉट कल्पनाच्या मोबाइलमध्ये कसे ?- पाकिस्तानमध्ये हॉटेल चालवणाऱ्या अशरफच्या भावाशी कल्पना सातत्याने व्हॉटस्ॲपद्वारे संपर्कात. त्याच वेळी पेशावर कँटोन्मेंट बोर्ड व त्यातील अधिकाऱ्यांच्या नावे नंबर सेव्ह आढळले. ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.- अशरफचा भाऊ गालिबसोबतचे ‘चॅट’ अचानक ’डिलिट’ का व कोणी केले ?-१ जानेवारी २०२५ पासून तिच्या खात्यात ३२ लाख रुपये आले.- कल्पनाने देशात पाच विमान प्रवास केले. ते कोणाला भेटण्यासाठी, याचा पोलिस तपास करत आहेत.

१९ कोटींचे धनादेशकल्पनाच्या घरझडतीत चेतन भानुशाली व निखिल भाकरे यांच्या नावे कॉसमॉस बँकेचे अनुक्रमे १९ कोटी व ६ लाखांचे दोन धनादेश आढळले. ते कोण आहेत, हे कल्पना सांगत नसल्याने पोलिस त्या दोघांच्या शोधात आहेत.

ओएसडी टू होम मिनिस्टर क्रमांक अचानक स्विच ऑफकल्पनाच्या मोबाइलमध्ये मॅट्रिक टेक्नॉलॉजी नावाने केंद्रीय ऊर्जा मंत्रालयांना लिहिलेले लेटरहेड आढळले आहे. शिवाय, केंद्रीय गृहमंत्र्यांचे ओएसडी म्हणून अभिषेक चौधरी नावाने एक नंबरही सेव्ह आढळला. मात्र, कल्पनाला अटक होताच तो बंद झाला; तर प्रियकराने दिल्ली सोडून पलायन केले आहे. पोलिसांचे एक पथक लवकरच त्याच्या अटकेसाठी रवाना होणार आहे.

अशरफला मनोमन मानते पतीकल्पना व अशरफची एसएफएस मैदानावरील एका प्रदर्शनात भेट झाली, तेव्हा तिने स्वत: आयएएस अधिकारी असल्याचे त्याला सांगितले. त्यानंतर दोघांचे प्रेमसंबंध जुळले. कल्पनाने अशरफचा नंबर ‘माय लव्हली हसबंड’ नावाने सेव्ह केल्याने ती त्याला मनोमन पती मानते. अशरफने तिला पेशावर कँटोन्मेंट बोर्ड, अधिकारी, तेथील अफगाणिस्तानचे नंबर दिले का, याचाही तपास यंत्रणा तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake IAS Woman: Pakistan Links Uncovered in 10-Month Contact Spree

Web Summary : A fake IAS officer, Kalpana Bhagwat, communicated with Pakistani numbers for months. Investigation revealed ties to Afghan contacts. Large sums of money and suspicious documents found raise national security concerns. Her lover, an Afghan national, is on the run. Police are investigating financial transactions and travel history.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीPakistanपाकिस्तान