शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

शरबताने निर्माण केला हिंदू-मुस्लीमांमध्ये गोडवा; रामनवमीला इब्राहीम भैय्याचा असतो स्टॉल

By बापू सोळुंके | Updated: March 30, 2023 19:25 IST

माजी नगरसेवक इब्राहिम भैय्याच्या शरबतातून दिसली हिंदू-मुस्लीम एकता

छत्रपती संभाजीनगर: किराडपुरा येथील राममंदीराजवळ रात्री झालेल्या दंगलीमुळे राममंदीर परिसरात तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर न डगमगता माजी नगरसेवक इब्राहिम शेख यांनी दरवर्षीप्रमाणे रामभक्तांसाठी शरबतची व्यवस्था केली. हिंदू भाविकांनीही मनात कोणताही द्वेष बाळगताच या स्टॉलवर शरबत पिण्यासाठी गर्दी करीत दोन धर्मियामध्ये दरी निर्माण करू इच्छिणाऱ्यांना एक चपराक दिली.

बुधवारी रात्री किराडपुरा येथे दोन गटात झालेल्या वादानंतर समाजकंटकांनी पोलिसांची वाहने जाळून टाकली. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी गोळीबार करावा लागला होता. याघटनेमुळे दोन भिन्न धर्मियांमध्ये तणाव निर्माण झाला होता. दरवर्षी येथील राममंदीरात श्रीराम जन्मोत्सवाचा कार्यक्रम होत असतो. या कार्यक्रमासाठी हजारो भाविक उपस्थित राहतात आणि दर्शनासाठी सहकुटुंब येत असतात. उन्हाळ्यातील हा उत्सव असल्याने किराडपुरा येथील माजी नगरसेवक इब्राहिम भैय्या हे दरवर्षी भाविकांसाठी शरबत ची व्यवस्था करतात. रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर राममंदीरासमोरच त्यांनी लावलेला शरबत वाटपाचा स्टॉल हिंदू, मुस्लीमांमध्ये वैर निर्माण करू इच्छिणाऱ्यांसाठी एक चपराक ठरली आहे. इब्राहिम भैय्या आणि त्यांचे सहकाऱ्याकडून हिंदू भाविक मोठ्या विश्वासाने शरबत घेऊन पीत होते. आमदार प्रदीप जैस्वाल यांनी स्वत:या शरबतचा आस्वाद घेत शहरात शांतता राखण्याचे आवाहन केले.

कोणताही द्वेष नाही रामनवमीनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आम्ही दहा वर्षापासून शरबतचा स्टॉल लावतो. येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सेवा करण्याची संधी यानिमित्ताने मिळते. रात्री झालेल्या घटनेनंतर आज लावलेल्या स्टॉलवर शरबत पिण्यासाठी हिंदू भाविकांनी गर्दी केली. यावरून भाविकांच्या मनात मुस्लीमाविषयी कोणताही द्वेष नाही, हे सिद्ध झाले. रात्री झालेल्या घटनेतील समाजकंटक स्थानिक नव्हते. आम्ही शांततेच आवाहन केल्यानंतरही त्यांनी आमच्यावर दगडफेक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHinduहिंदूMuslimमुस्लीमAurangabadऔरंगाबाद