शहरं
Join us  
Trending Stories
1
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
2
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
3
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
4
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
5
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
6
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!
7
जसप्रीत बुमराहने वाढवलं BCCIचं टेन्शन, टीम इंडियातून इंग्लंड दौऱ्यावर फक्त इतकेच सामने खेळणार
8
ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या
9
मुंबई-दिल्ली महामार्गावर कार थांबवली, महिलेसोबत सुरू केले अश्लील चाळे, भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल 
10
२५ लाख रोजगार, ७५ हजार कोटींची गुंतवणूक! मुकेश अंबानी 'या' राज्यातील तरुणांचं बदलणार भविष्य
11
भारत पाकिस्तानला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत; FATF ग्रे लिस्टमध्ये येणार पाक...
12
'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री?
13
Ritual: 'हुंडा देणे' ही कुप्रथा भारतीय संस्कृतीत वा इतिहासात नव्हतीच, मग आली कुठून?
14
शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले? डिमॅट अकाउंट कायमचं कसं बंद करायचं? 'ही' आहे सोपी पद्धत
15
पीडित तरुणीचे आरोपीवर प्रेम, लग्नही केले; सर्वोच्च न्यायालयाला बदलावा लागला आपलाच निर्णय...
16
बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत; सुरक्षारक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार, एक ठार
17
मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला
18
"तिला घटस्फोट दे, नाहीतर तुला जिवे मारू’’, पत्नीच्या प्रियकराने दिलेल्या धमकीमुळे पती घाबरला, त्यानंतर...  
19
बिटकॉइन म्हणजे काय? ते कोण बनवतं? बँकेशिवाय कसं काम करतं? वाचा!
20
Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती

कटिंग चहाची लज्जतच न्यारी! ब्रँडच्या जमान्यातही चहाप्रेमी म्हणतात टपरीचाच चहा लय भारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 19:46 IST

जागतिक चहा दिवस! शहरातील चहाप्रेमी म्हणतात, ब्रँड्स कितीही आले तरी टपरीवरच्या चहाची मजा काही औरच. ती अजूनही टिकून आहे.

- प्राची पाटीलछत्रपती संभाजीनगर : प्रत्येकाला हव्याहव्याशा वाटणाऱ्या या चहाने हजारो हातांना रोजगारही दिला. शहरात प्रत्येक चौकांत चहाची विविध ब्रँडेड दुकाने दिसतात. मात्र, टपरीवरील वेलची-अद्रक घातलेला मसाला चहाच अनेकांना आकर्षित करतो. ब्रँडेड चहांची अनेक चकचकीत हॉटेल्स असली तरी टपरीवरच्या कटिंग चहाची लज्जतच न्यारी आहे, अशी प्रतिक्रिया चहाप्रेमींनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. जागतिक चहा दिवस दरवर्षी २१ मे रोजी साजरा केला जातो.

शहरात चहाच्या टपऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कॉलेज, बाजारपेठा याठिकाणी असलेल्या टपऱ्यांवर सतत गर्दी पाहायला मिळते. ब्रँड्स कितीही आले तरी टपरीवरच्या चहाची मजा काही औरच. ती अजूनही टिकून आहे. अलीकडच्या काळात चहाचा व्यवसाय तरुणांना मोठ्या प्रमाणावर खुणावत आहे. मोठ्या संख्येने तरुण या व्यवसायात पदार्पण करत आहेत. अनेकजण नवनव्या कल्पना प्रत्यक्षात आणत आहेत. पण नानाविध अमृततुल्य चहांच्या हॉटेल्स, ग्रीन टी, ब्लॅक टी सोबतच टपरीवरील ‘चाय’ला अनेकांची पसंती आहे.

वडिलांनंतर मुलगा चहा व्यवसायातवडिलांपासून चालत असलेला चहाचा व्यवसाय योगेश सोनवणे यांनी पुढे नेला. साखरेच्या चहाची जागा गुळाच्या चहाने घेतली. सकाळी सातपूर्वीच चहा बनवण्याची प्रक्रिया ते सुरू करतात. येथे विद्यार्थी, नोकरदार वर्गाची चहा पिण्यासाठी गर्दी होते. दिवसभरात त्यांचा सरासरी एक हजार कप चहा विकला जातो. चहाप्रेमींच्या बळावर गेल्या दहा वर्षांत त्यांनी चहाच्या दोन गाड्या सुरू केल्यात. ‘चकचकीत हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा ग्राहक आमच्या चहालाच अधिक पसंती देतात’, असे सोनवणे म्हणाले.

गवती चहालाही पसंतीस्वतंत्र हॉटेलचा व्यवसाय असतानाही मनोज चव्हाण यांनी चहाची टपरी टाकली. घरीच पिकवला जाणारा गवती चहा, ही त्यांच्या चहाची खासियत. त्यांच्या टपरीवरच्या चहाचा सुगंध हा दूरूनच आकर्षित करतो. ‘इतर व्यवसायांना ऋतुमानाचा फटका बसू शकतो. पण आमची चहाची टपरी नेहमीच चहाप्रेमींनी भरलेली असते. ऊन, पाऊस, थंडी या तिन्ही ऋतूंमध्ये चहाप्रेमी टपरी गाठतातच’, असे चव्हाण यांनी सांगितले.

चहाने दिले नवे आयुष्यएका अपघातात आलेल्या अपंगत्वानंतर रिक्षाचालक कडुबा वाघ यांना रिक्षा चालवणे अशक्य झाले. त्यानंतर त्यांनी चहाचा गाडा टाकला. स्वच्छता, उत्तम चवीच्या जोरावर अल्पावधीतच टीव्ही सेंटर परिसरात त्यांची टपरी प्रसिद्ध झाली. विद्यार्थी, शिक्षक, बँकर्स, नोकरदार येथे मोठी गर्दी करतात. संकटाशी दोन हात करून पुन्हा एकदा उभे राहिलेल्या कडुबांना चहाने नवे आयुष्यच दिले.

चहाचे विविध प्रकारकुल्हड, मसाला, चॉकलेट, विलायची चहाग्रीन-टी, लेमन टी, ब्लॅक टी, हर्बल टी.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर