लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कचरा उचलणे व त्यावर प्रक्रिया करणे, यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली असून, यासंदर्भात मनपा आयुक्तांकडे नुकतीच प्री-बीड (निविदापूर्व) बैठक झाली. देशभरातील ७ मोठ्या कंपन्यांनी हे काम करण्याची तयारी दर्शविली. बंगळुरू, सुरत, पुणे, मुंबई आदी शहरांतील या कंपन्या आहेत.कचºयावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी राज्य सरकारने महापालिकेच्या ८९ कोटींच्या डीपीआरला मंजुरी दिली आहे. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी वॉर्डनिहाय संकलन, वाहतूक, दोन ठिकाणी प्रक्रियेसाठी मशीनसह देखभाल, अशा वेगवेगळ्या निविदा काढल्या आहेत. निविदा स्वीकारण्याची अंतिम तारीख ६ जुलै आहे. महापालिकेच्या निविदा प्रक्रियेला खाजगी कंपन्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. प्री-बीड बैठक आयुक्तांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी बंगळुरू, सुरत, पुणे, मुंबई यासह सात एजन्सींच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली. निविदांमधील अटी-शर्ती तसेच काही तांत्रिक मुद्यांवर कंपन्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. आपल्या तक्रारी आणि गरजा लेखी स्वरुपात कंपन्यांनी आयुक्तांकडे मांडल्या.मध्यवर्ती कचरा प्रक्रियेच्या निविदेसाठी पाच एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते. हर्सूल येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रक्रिया करण्यासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागविले जाणार आहेत. तसेच कचºयाच्या प्रक्रियेसाठी प्रभागनिहाय मशीनसह आॅपरेटिंग आणि मेंटेनन्सकरिता प्रायोगिक तत्त्वावर प्रभाग-७ आणि प्रभाग-९ करितादेखील एजन्सींनी प्रतिसाद दिला असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.जनजागृतीही सुरू४शहरातील कचºयाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक जटिल बनत चालला आहे. आजही नागरिक ओला व सुका कचरा वेगळा करून देत नाहीत. जुन्या शहरात तर चौकाचौकात कचरा आणून टाकण्यात येतो. नागरिकांमध्ये जनजागृती करून त्यांची मानसिकता बदलण्यासाठी दिल्ली येथील तीन एजन्सींना जनजागृतीचे काम देण्यात आले आहे. नॉलेज लिंक, फिडबॅक फाऊंडेशन, अॅक्शन बेस सोसायटी, या एजन्सीने कामाला सुरुवात केली असून, संपूर्ण डाटा जमा केला जात आहे. तसेच स्वच्छता निरीक्षक, सफाई कामगारांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय घरोघरी जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.
औरंगाबादच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी देशभरातून सात कंपन्या इच्छुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 00:31 IST
शहरातील कचरा उचलणे व त्यावर प्रक्रिया करणे, यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली असून, यासंदर्भात मनपा आयुक्तांकडे नुकतीच प्री-बीड (निविदापूर्व) बैठक झाली. देशभरातील ७ मोठ्या कंपन्यांनी हे काम करण्याची तयारी दर्शविली. बंगळुरू, सुरत, पुणे, मुंबई आदी शहरांतील या कंपन्या आहेत.
औरंगाबादच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी देशभरातून सात कंपन्या इच्छुक
ठळक मुद्देप्री-बीड बैठक : निविदा प्रक्रियेत तांत्रिक बदल करण्याच्या सूचना