शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

निकालांच्या गोंधळावर तोडगा; विद्यापीठात नियामक समित्यांनी खातरजमा केल्यानंतरच लागणार निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 11:58 IST

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university : परीक्षा विभागाने बी.कॉम प्रथम सत्र वर्षाच्या कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या विषयाचा सलग तीनवेळा वेगवेगळा निकाल जाहीर केल्यामुळे गोंधळात वाढ झाली.

ठळक मुद्देजुन्या विद्यापीठ कायद्यामध्ये निकाल नियामक समितीची तरतूद होती. ती आता नवीन कायद्यात नाही. कुलगुरु आपल्या अधिकारात अशी समिती स्थापन करू शकतात. त्यानुसार सर्व विद्याशाखांच्या अशा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत

औरंगाबाद : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या निकालांचा गोंधळ थांबविण्यासाठी विद्यापीठाने आता ‘निकाल नियामक समित्या’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, नियामक समित्यांनी खातरजमा केल्यानंतरच परीक्षा विभागाला यापुढे विविध विद्याशाखांचे निकाल जाहीर करण्याची मुभा राहील.

उच्चशिक्षण विभागाच्या सूचनेनुसार कोरोना महामारीच्या काळात राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांनी ऑनलाइन परीक्षांचे आयोजन केले. यामध्ये सुरुवातीला थोड्याफार तांत्रिक अडचणी सोडल्या तर राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे ऑनलाइन परीक्षेत यशस्वी राहिले आहे. मात्र, यावेळी बी.कॉम प्रथम सत्र वर्षाच्या कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या विषयाच्या पेपरमध्ये ११ हजारांपैकी अवघे १८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामुळे विद्यार्थी, पालक, विद्यार्थी संघटनांनी ओरड केली. विशेष म्हणजे, परीक्षा विभागाने या विषयाचा सलग तीनवेळा वेगवेगळा निकाल जाहीर केल्यामुळे गोंधळात वाढ झाली.

दरम्यान, कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी तथ्यशोधनासाठी तडकाफडकी एक उपसमिती नेमली. या समितीने केलेल्या शिफारसीनुसार परीक्षा मंडळाच्या (बीओई) बैठकीत अन्य विषयांच्या गुणांच्या सरासरीएवढे गुणदान करून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार फेरनिकालमध्ये दहा हजार ३३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तथापि, जुन्या विद्यापीठ कायद्यामध्ये निकाल नियामक समितीची तरतूद होती. ती आता नवीन कायद्यात नाही. मात्र, कुलगुरु आपल्या अधिकारात अशी समिती स्थापन करू शकतात. त्यानुसार सर्व विद्याशाखांच्या अशा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समितीमध्ये संबंधित विद्याशाखेचे अधिष्ठाता, त्याच विद्याशाखेचे वरिष्ठ प्राध्यापक व परीक्षा नियंत्रक यांचा समावेश आहे. प्रत्येक विद्याशाखेसाठी अशी समिती कार्यरत राहील. निकाल जाहीर करण्यापूर्वी तो नियामक समितीसमोर पडताळणीसाठी ठेवला जाईल. समिती सदस्य गुणदानाची पद्धत अर्थात विद्यार्थ्यांना जास्त गुण अथवा कमी गुण देण्यात आले आहेत का? विहित पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिका काढण्यात आली होती का? योग्य प्रकारे उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यात आली आहे का? आदींची बारकाईने पडताळणी करतील. पडताळणी केल्यानंतरच निकाल जाहीर करण्यास परीक्षा व मूल्यमापन विभागाला हिरवा कंदील दाखवला जाईल.

बी.कॉमचा चौथ्यांदा निकाल जाहीरबी.कॉम प्रथम वर्षाच्या कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या विषयाचा दोन दिवसांपूर्वी चौथ्यांदा निकाल जाहीर करण्यात आला. या विषयाची परीक्षा ११ हजार ३०५ विद्यार्थ्यांनी दिली होती. सुरुवातील फक्त १८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थी नापास झाल्यास सरासरी गुणांनुसार विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचे अधिकार परीक्षा मंडळाला आहेत. त्यानुसार आता दहा हजार ३३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणAurangabadऔरंगाबाद