शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

कचरा प्रश्नावर औरंगाबादमध्ये बैठकांचे सत्र सुरूच; आणखी काही दिवस शहर कचर्‍यातच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 18:11 IST

शहर आणि आसपास कुठेच कचरा साठवून ठेवता येणार नाही, हे माहीत असूनही महापालिकेने कचराकोंडीवर कोणताच तोडगा काढलेला नाही.

औरंगाबाद : शहर आणि आसपास कुठेच कचरा साठवून ठेवता येणार नाही, हे माहीत असूनही महापालिकेने कचराकोंडीवर कोणताच तोडगा काढलेला नाही. मागील एक महिन्यात पन्नासपेक्षा अधिक बैठका घेण्यात आल्या आहेत. मात्र, ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. आजही शहरातील प्रमुख रस्त्यांवर १० हजार मेट्रिक टन कचरा पडून आहे. नागरिक दररोज या कचर्‍याला आग लावून देत आहेत. धुरामुळे परिसरात राहणार्‍या नागरिकांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत.

शहरात कोणतीही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास महापालिका कायद्यात अत्यावश्यक बाबींच्या खरेदीची मुभा आहे. ६७-३-सी या कलमाचा वापर आजपर्यंत महापालिकेत दहा हजार वेळेस करण्यात आला असेल. जलवाहिन्या टाकणे, गट्टू बसविणे, फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करणे आदी अनेक कामांसाठी या कलमाचा वापर झाला आहे. मागील एक महिन्यापासून शहरात कचर्‍यामुळे आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. साठलेल्या कचर्‍यामुळे रोगराई पसरू शकते. सुदैवाने अद्यापपर्यंत रोगराई पसरलेली नाही. मात्र, महापालिका प्रशासन आणीबाणीच्या कायद्याचा वापर करायला अजिबात तयार नाही. पदाधिकार्‍यांनी अनेकदा सूचना केल्यानंतरही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कचर्‍यावर प्रक्रिया करणार्‍या मशीन निविदा पद्धतीनेच खरेदी करणार, हा प्रशासनाचा हट्ट कायम आहे. 

मंगळवारी राज्य शासनाचे सचिव सुधाकर बोबडे यांच्या उपस्थितीत कचर्‍यावर प्रक्रिया करणार्‍या कोणत्या मशीन खरेदी करायच्या, हे निश्चित झाले. त्यासाठीही निविदा पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. इच्छुक कंपन्यांनी ७ दिवसांत निविदा भराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. यंत्रसामुग्री खरेदीसाठी संपूर्ण रक्कम राज्य शासन देत आहे. बुधवारपर्यंत महापालिकेला सुमारे १० कोटींचा निधीही प्राप्त होणार आहे. शासन उदार अंत:करणाने या समस्येत मदत करायला तयार असतानाही महापालिका तत्परतेने काम करायला तयार नाही. सर्वसाधारण सभा, स्थायी समिती आणि महापालिकेत अद्यापपर्यंत पन्नासपेक्षा अधिक बैठका यासंदर्भात घेण्यात आल्या आहेत.

जागाच निश्चित नाहीतशहरातील ९ झोनमध्ये कचर्‍यावर प्रक्रिया करणार्‍या मशीन लावण्याचे निश्चित झाले असले तरी या मशीन कोणत्या जागांवर लावणार हे निश्चित नाही. जागा शोधणे, मशीन बसविणे, मशीनसाठी शेड तयार करणे आदी कामांसाठी आणखी एक ते दीड महिना लागणार आहे. 

नागरिकांची सुटका तूर्त नाहीचमहापालिका प्रशासनाच्या या उदासीन आणि लालफीतशाही कारभारामुळे आणखी काही दिवस औरंगाबादकरांना कचराकोंडीचा सामना करावा लागणार आहे. आज किंवा उद्या हा प्रश्न सुटेल या आशेवर नागरिक आहेत. महापालिका तूर्त तरी हा प्रश्न सोडविण्याच्या मन:स्थितीत नाही.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाNaregaon Garbage Depoनारेगाव कचरा डेपोGarbage Disposal Issueकचरा प्रश्नcommissionerआयुक्त