शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

वादात पती शेजाऱ्यांना साथ देतो, मारहाण करतो; महिलेने पोलीस आयुक्तालयात घेतले पेटवून

By राम शिनगारे | Updated: September 1, 2022 14:29 IST

घरगुती वादातून महिलेने टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती आहे.

औरंगाबाद: घरघुती वादातून महिलेने टोकाचे पाऊल उचलत पोलीस आयुक्तालयात पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना आज दुपारी घडली. महिला गंभीररित्या भाजली असून तिच्यावर शासकीय रुग्णालय  घाटी येथे उपचार सुरु आहेत.

सविता दीपक काळे ( 32, रा.मांडवा गाव, ता.गंगापूर) असे महिलेचे नाव आहे. नवऱ्यासोबत सारखे भांडण होत होते यातून सविता काळे तणावात होत्या. महिलेचा मूळ वाद शेजाऱ्यांसोबत आहे, यात पतीही शेजाऱ्यांची साथ देतो. मारहाण करतो अशी महिलेची तक्रार आहे. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. दरम्यान, महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांना देखील पतीने मारहाण केली होती. त्या तणावातून सविता काळे आज दुपारी शहरातील पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झाल्या. कार्यालयात त्यांनी निवेदन सादर केले. 

निवेदन देऊन खाली येताच आयुक्तालयाच्या पायरीजवळ अचानक त्यांनी टोकाचा निर्णय घेत सोबत आणलेला ज्वलनशील पदार्थ स्वतःच्या अंगावर टाकून पेटवून घेतले. पोलीस आयुक्त यांच्या गाडीसमोर त्यांच्याच कार्यालयामध्ये जाळून घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी लागलीच महिलेस घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार महिला ८० टक्के भाजली आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी