शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गजानन बारवाल यांना स्वगृही आणण्याचे सेनेचे प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 17:20 IST

शिवसेनेतील अंतर्गत कलहाला कंटाळून गजानन बारवाल २०१४ मध्ये पदमपुरा येथून नगरसेवकपदाची अपक्ष निवडणूक लढवून निवडून आले.

ठळक मुद्देपक्षात गुदमरल्यासारखे होऊ लागल्याने गजानन बारवाल यांनी २०१४ मध्ये मनपा निवडणुकीमध्ये सेनेला जय महाराष्ट्र केला महापालिकेत त्यांनी अपक्ष नगरसेवकांची मोट बांधत स्वतंत्र आघाडी स्थापन केली. या आघाडीचे प्रमुख बारवाल स्वत: आहेत.

औरंगाबाद : शिवसेनेतील अंतर्गत कलहाला कंटाळून गजानन बारवाल २०१४ मध्ये पदमपुरा येथून नगरसेवकपदाची अपक्ष निवडणूक लढवून निवडून आले. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या ते स्थायी समितीचे सभापतीही आहेत. त्यांना परत एकदा सेनेत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. १९ एप्रिल रोजी सेनाप्रमुख उद्धव ठाकरे शहरात दाखल होत आहेत. त्यांच्या उपस्थितीत बारवाल यांना सेनेत घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. 

सेनेत ठराविक नेत्यांचीच दादागिरी चालते. त्यामुळे पक्षातील अनेक मातब्बर नेते नाराज आहेत. काही नेत्यांना तर पक्षाने बाजूला केले आहे. ही मंडळी पक्ष सोडून दुसरीकडेही जाऊ शकत नाही. कारण त्यांची निष्ठा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतची आहे. पक्षात गुदमरल्यासारखे होऊ लागल्याने गजानन बारवाल यांनी २०१४ मध्ये मनपा निवडणुकीमध्ये सेनेला जय महाराष्ट्र करून पदमपुरा वॉर्डातून अपक्ष निवडणूक लढविणे पसंत केले. त्यांना पराभूत करण्यासाठी सेनेने सर्व शक्ती पणाला लावली. मात्र, सेना नेत्यांना यश आले नाही. निवडून आल्यावर बारवाल यांनी भाजपमध्ये जाणे पसंत केले. महापालिकेत त्यांनी अपक्ष नगरसेवकांची मोट बांधत स्वतंत्र आघाडी स्थापन केली. या आघाडीचे प्रमुख बारवाल स्वत: आहेत.

भाजपने त्यांना आपल्या वाट्याचे सभापतीपदही दिले. त्यांचा कार्यकाळ ३० एप्रिल रोजी संपत आहे. या वर्षभराच्या कार्यकाळात बारवाल यांना ‘समाधान’कारक असे काम करता आले नाही. त्यामुळे पुन्हा एक वर्ष सभापतीपद वाढवून मिळावे, अशी त्यांची इच्छा आहे. पुढील सभापतीपद सेनेच्या कोट्यात आहे. त्यामुळे सेना बारवाल यांना संधी देण्याचा प्रश्नच नाही. उलट सेनेत राजू वैद्य, राजेंद्र जंजाळ व इतर ज्येष्ठ नगरसेवक या पदावर दावा ठोकत आहेत.

भाजपला धक्का देण्याचा प्रयत्न गजानन बारवाल सेनेत असताना त्यांना सभापती, महापौरपद देण्यात आले होते. एकदा विधानसभेचे तिकीटही सेनेनेच दिले होते. भविष्यात भाजपमध्ये खूप काही मिळणार नाही, त्यामुळे स्वगृही परत या, असा आग्रह सेनेच्या काही नेत्यांनी बारवाल यांच्यासमोर धरला आहे. बारवाल यांनी सेनेत परत येण्यासाठी इच्छाही व्यक्त केलेली नाही. येणारे सभापतीपद देण्याचे आश्वासन बारवाल यांना सेनेकडून देण्यात येत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

मी भाजपमध्ये सुखी आहे...गजानन बारवाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मी खूप विचारपूर्वक निर्णय घेतला. सध्या भाजपमध्ये मी खुश आहे. सेनेत परत जाण्याचा विचारही नाही. भाजपनेही मला खूप काही भरभरून दिले आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा