शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

'वडिलांची शेती विकून १० लाख आण'; सासरच्या जाचाला कंटाळून गर्भवती विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 18:19 IST

Pregnant women commits suicide due to dowry : पूजा गर्भवती असून ती लाडकी असल्याने तिचे वडील पैसे देतील, अशी त्यांना अपेक्षा होती.

ठळक मुद्देवर्षभरापूर्वी झाला होता विवाह

औरंगाबाद : माहेरून दहा लाख रुपये आणावे, याकरिता पतीसह सासरच्या मंडळीकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून गर्भवती विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी न्यू हनुमाननगरात घडली. या घटनेनंतर विवाहितेच्या वडिलांनी नोंदविलेल्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिसांनी पतीसह सासू, सासरा आणि नणंदा अशा सहा जणांंविरोधात हुंडाबळी कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. ( Pregnant woman commits suicide due to father-in-law's harassment) 

अमोल अण्णासाहेब त्रिभुवन, सासरा अण्णासाहेब, सासू सिंधूबाई, नणंद भाग्यश्री मुन्ना महांकाळे (रा. भारतनगर, गारखेडा), नणंद अंजू आणि जयश्री अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. पूजा अमोल त्रिभुवन (२०, रा. न्यू हनुमाननगर ) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पूजा आणि अमोल यांचा गतवर्षी १४ जून रोजी महांकाळ वडगाव (ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) येथे विवाह झाला. दीड तोळ्याची अंगठी आणि ३५ हजार रुपये हुंडा पूजाच्या आईवडिलांनी आरोपींना दिला होता. लग्नानंतर तीन महिने चांगले वागविल्यावर आरोपींनी काहीतरी व्यवसाय करण्यासाठी अथवा प्लाॅट खरेदी करण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणण्याची मागणी केली. तुझ्या वडिलांकडे चांगली शेती आहे, तुझ्या वाट्याची शेती विकून पैसे देण्यास सांग, असे म्हणून त्यांनी तिचा छळ सुरू केला. ही बाब पूजाने आई, वडील आणि भावाला फोन करून सांगितली. यानंतर त्यांनी आरोपींना समजावून सांगितल्यानंतरही त्यांच्याकडून तिला त्रास सुरूच होता.

यामुळे पाच ते सहा महिन्यांपूर्वी ते तिला माहेरी घेऊन गेले होते. तेव्हा आरोपींनी यापुढे त्रास देणार नाही, असे सांगून ते तिला नांदायला घेऊन आले. येथे आणल्यावर त्यांनी तिचा पुन्हा छळ सुरू केला. पूजा गर्भवती असून ती लाडकी असल्याने तिचे वडील पैसे देतील, अशी त्यांना अपेक्षा होती. तिच्या वडिलांनीही आरोपींना पैसे देण्यासाठी शेती विकण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, त्रास वाढतच असल्याने सोमवारी सकाळी पूजाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब कळताच तिच्या पतीने तिला घाटीत दाखल केले. तिचा पतीशिवाय अन्य आरोपी घराला कुलूप लावून पळून गेले होते. याविषयी पूजाचे वडील सुभाष यादव महांकाळे यांनी पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. आरोपींच्या अटकेसाठी तिच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी