शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंसमोर रिकाम्या खुर्च्या; भाषण थोडक्यात उरकून केला 'जय महाराष्ट्र'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 19:00 IST

महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टिज असोशिएशन (मेस्टा) संघटनेच्या राज्यव्यापी अधिवेशनाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले

ठळक मुद्देसंयोजकांनी सत्कार करताच त्यांनी स्वत:हून माईकचा ताबा घेतला. अधिवेशनाचे आमंत्रण मिळालेले नसल्याचे सांगितलेअवघ्या अडीज मिनिटात भाषण आटोपते घेतले.

औरंगाबाद : हजारो, लाखोंच्या उपस्थितीत सभा गाजविण्यासाठी प्रसिद्ध असलेले मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना रिकाम्या खुर्च्या पाहून भाषण आटोपते घेण्याचा प्रसंग औरंगाबादेत ओढावला.

महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टिज असोशिएशन (मेस्टा) संघटनेच्या राज्यव्यापी अधिवेशनाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबादेतील श्रीहरी पव्हेलियन येथे शनिवारी (दि.१५) दुपारी साडेबारा वाजता झाले. या अधिवेशनाला दहा हजारांपेक्षा अधिक संस्थाचालक, शिक्षक उपस्थित राहणार असल्याचे संयोजकांनी सांगितले होते.  राज ठाकरे यांचे सभागृहात आगमन झाल्यानंतर  पाठीमागे बसलेल्या लोकांना पुढे बोलावण्यात आले. त्यामुळे व्हिआयपींसाठीच्या केलेल्या व्यवस्थेच्या पाठिमागे हजारो खुर्च्या रिकाम्या होत्या. समोरील रिकाम्या खुर्च्यांचे चित्र पाहताच राज ठाकरे यांनी तात्काळ दिपप्रज्वलन केले. 

संयोजकांनी सत्कार करताच त्यांनी स्वत:हून माईकचा ताबा घेतला. या अधिवेशनाचे आमंत्रण मिळालेले नव्हते. माझ्या नियोजित दौऱ्यात त्याचा समावेशही नव्हता. तरीही काही लोकांच्या आग्रहामुळे  याठिकाणी शुभेच्छा देण्यात आलो आहे, असे स्पष्ट करत त्यांनी  अवघ्या अडीज मिनिटात भाषण आटोपते घेतले. भाषण संपवताच त्यांनी व्यासपीठही सोडले. मात्र राज ठाकरे यांच्या अधिकृत दौऱ्यामध्ये या अधिवेशनाचा उल्लेख असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिले. रिकाम्या खुर्च्याविषयी माहिती देताना स्वागताध्यक्ष शिरिष बोराळकर म्हणाले, इंग्रजी शाळांचे संस्थाचालक राज्याच्या कानाकोपऱ्यातुन येणार असल्यामुळे उशिरा पोहचतील. त्यामुळे गर्दी झाली नाही. सायंकाळी चार वाजेपर्यंत सर्व संस्थाचालक पोहचतील असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAurangabadऔरंगाबादTeacherशिक्षक