छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीजवळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बजरंग दल आणि व्हीएचपी यांच्याकडून इशारा देण्यात आला होता. यामुळे आता प्रशासनाने कबरीजवळ बंदोबस्त वाढवला आहे. एसआरपीएफच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे.
काही दिवसापूर्वीच देशभरात छावा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. छावा चित्रपटामुळे छत्रपती संभाजीराजे यांचा इतिहास सर्वांना माहित झाला आहे. छत्रपती संभाजीराजेंना किती निर्घुणपणे ठार मारण्यात आल्याचा इतिहास पाहून तीव्र संतापही व्यक्त होत आहे. काही दिवसापूर्वी औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारने देखभालीसाठी पॅकेज जाहीर केले. तर दुसरीकडे औरंगजेबाकडून झालेल्या अत्याचाराच्या इतिहासाची आठवण घेत काही हिंदुत्त्वावादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. तसेच, या संघटनानी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, बजरंग दल आणि व्हिएचपीकडून इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन अॅक्शनमोडवर आले आहे.औरंगजेबच्या कबर परिसरात पोलिसांचा बंदोबस वाढवण्यात आला असून एसआरपीची एक तुकडी कबरीच्या घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये कबरीच्या ठिकाणी दोन पोलीस अधिकारी आणि १५ कर्मचारी बंदोबस्तात तैनात करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी आज कबरीच्या आतील बाजूची पाहणी केली. तसेच कबरच्या दोन ठिकाणी नाकाबंदी केली आहे. दोन ठिकाणी फिक्स पॉइंट लावले आहेत. आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून ही कबर हटविण्याची मागणी करत इशारा देण्यात आल्याने येथील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.