वाळूजमध्ये दुय्यम निबंधक कार्यालय होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 10:44 PM2019-06-13T22:44:00+5:302019-06-13T22:44:09+5:30

वाळूज येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरु करण्यासाठी शासनस्तरावरुन हालचाली सुरु झाल्या आहेत.

 Secondary registrar office will be in Jalaj! | वाळूजमध्ये दुय्यम निबंधक कार्यालय होणार!

वाळूजमध्ये दुय्यम निबंधक कार्यालय होणार!

googlenewsNext

वाळूज महानगर : वाळूज येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरु करण्यासाठी शासनस्तरावरुन हालचाली सुरु झाल्या आहेत. पुणे येथील नोंदणी उपमहानिरीक्षक सी.बी.भुरकुडे यांनी महसूल व वन विभागाचे अवर सचिव यांना नुकतेच पत्र दिले आहे. गावात दुय्यम निबंधक कार्यालय सुरु करण्याची प्रकिया सुरु झाल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे.


वाळूजमहानगर परिसरातील वाळूज, रांजणगाव,जोगेश्वरी, कमळापूर, घाणेगाव, विटावा, एकलहेरा, नांदेडा, आंबेलोहळ, शिवराई, नारायणपूर, नायगाव-बकवालनगर, लांझी, पिंपरखेडा, लिंबेजळगाव, तुर्काबाद, जिकठाण आदी भागातील नागरिकांना जमिनी व भुखंडाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यासाठी जवळपास ३० ते ४० किलोमीटर अंतर पार करुन गंगापूरला जावे लागते. यात वेळ आणि पैशांचा अपव्यय होत होता.

या पार्श्वभूमीवर वाळूजमध्ये दुय्यम निबंधक कार्यालय सुरु करण्याची मागणी लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी लावून धरली होती. यासाठी नागरिकांनी कृती समिती स्थापन करुन शासनदरबारी पाठपुरावा केला. गावात दुय्यम निबंधक कार्यालय सुरु करण्यासाठी आ.प्रशांत बंब, माजी सभापती मनोज जैस्वाल, ग्रामविकास अधिकारी एस.सी.लव्हाळे यांनी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता.


ग्राम पंचायत देणार जागा
वाळूज गावात दुय्यम निबंधक कार्यालयासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची तयारी ग्रामपंचायतीने दर्शविली आहे. गट नंबर ३६१ मधील गायरान जमीन उपलब्ध करुन देणार असल्याचे सरपंच पपीन माने, उपसरपंच मनोज जैस्वाल, ग्रामविकास अधिकारी एस.सी.लव्हाळे यांनी सांगितले.


कार्यालयाचा प्रस्ताव शासनाकडे
वाळूज येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरु करण्यासाठी औरंगाबादच्या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक विभागातर्फे ५ मे २०१८ रोजी अहवाल पाठविला होता. सदरचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे पत्र नोंदणी उपमहानिरीक्षक सी.बी.भुरकुडे यांनी महसूल व वन विभागाच्या अवर सचिवांना नुकतेच दिले आहे.

Web Title:  Secondary registrar office will be in Jalaj!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Walujवाळूज