शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

जिल्ह परिषदेत आरोप एकावर, भडकल्या दुसऱ्याच सभापती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 19:49 IST

समाजकल्याण सभापती कमकुवत असल्याचा होता आरोप

ठळक मुद्देअनुदानाची रक्कम जमा केलेली नाही, असा आरोप रमेश गायकवाड यांनी केलायावर महिला व बालकल्याण सभापती कुसुम लोहकरे यांचा पारा चढला.

औरंगाबाद : वर्षभरात समाजकल्याण विभागाच्या योजनांचे नियोजन झाले नाही. प्रशासनाने तयारी दर्शविली, तर सभापती मंजूर केलेल्या याद्यांना खोडा घालत होते. सभापती कमकुवत निघाले. महिला व बालकल्याण विभागाने लाभार्थ्यांच्या खात्यावर अजूनही अनुदानाची रक्कम जमा केलेली नाही, असा आरोप रमेश गायकवाड यांनी करताच  व्यासपीठावरील महिला व बालकल्याण सभापती कुसुम लोहकरे यांचा पारा चढला.  सभापती कमकुवत आहेत, तर तुम्ही कोणते दिवे लावले, या शब्दांत त्यांनी गायकवाड यांच्यावर तोफ डागली. 

स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य रमेश गायकवाड यांनी समाजकल्याण विभागाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, समाजक ल्याण अधिकारी मीना अंबादेकर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे समाजकल्याण अधिकाऱ्यांचा अतिरिक्त पदभार आता खुलताबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ज्ञानोबा मोकाटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे; परंतु हा पदभार सांभाळण्यासाठी ते इच्छुक नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अन्य सक्षम अधिकाऱ्यांकडे हा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला पाहिजे. मागील वर्षात समाजकल्याण विभागाच्या योजना मार्गी लागल्या नाहीत. अधिकारी लाभार्थ्यांच्या याद्या विषय समितीच्या बैठकीत सादर करायचे, तेव्हा समाजकल्याण सभापती याद्यांमध्ये बदल करण्यासाठी ती प्रक्रिया थांबवायचे. सभापतींमुळेच समाजकल्याण विभागाच्या कोणत्याही योजनांचा निधी खर्च होऊ शकला नाही. ते कमकुवत निघाले. त्यानंतर महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांच्या वस्तू खरेदी केल्यानंतर लाभार्थ्यांनी विभागाकडे पावत्या सादर केल्या; परंतु अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केलेली नाही.

हे ऐकल्यानंतर व्यासपीठावर बसलेल्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापतींचा पारा चढला. त्यांनी थेट रमेश गायकवाड यांच्यासह सभागृहातील अन्य सदस्य, सभापतींविरुद्ध आरोप केला. त्या म्हणाल्या की, मी कमकुवत आहे, तर तुम्ही कोणते दिवे लावले. तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांच्यासंबंधी चौकशी समिती नेमली होती. ती चौकशी करण्याऐवजी तुम्ही समितीतील सारेच ‘मॅनेज’ झाले. तुम्ही ती चौकशीच दडपून टाकली आणि आम्ही कमकुवत आहोत, असे म्हणता. तेव्हा त्यांच्या स्वीय सहायकाने ‘ते तुम्हाला कमकुवत सभापती म्हणाले नाहीत, ते समाजकल्याण सभापतींना म्हणाले, असे कानात जाऊन सांगितल्यावर त्यांना चूक लक्षात आली. दरम्यान, या घटनेमुळे सभागृहात उपस्थित सदस्य, पदाधिकारी, अधिकाऱ्यांची चांगलीच करमणूक झाली.

स्थायी समितीच्या बैठकीवर मोर्चातालुक्यातील अंजनडोह येथील ग्रामस्थांनी मंगळवारी जिल्हा परिषदेत स्थायी समितीची बैठक सुरू असताना मोर्चा नेला. तेथील राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. ७० टक्के काम पूर्ण झालेले असताना माजी सरपंच आणि विद्यमान सरपंच हे या योजनेत जाणीवपूर्वक राजकारण करून खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे. ही योजना पूर्ण झाली, तर अंजनडोह गावाचा पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे हे काम कोणत्याही परिस्थितीत बंद पडणार नाही, याची प्रशासनाने दखल घ्यावी, असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर, उपाध्यक्ष केशव तायडे, बांधकाम सभापती विलास भुमरे यांनी योजनेचे काम बंद पडणार नाही, यासाठी प्रशासनाला सूचना केल्या जातील, असे आश्वासन दिल्यानंतर मोर्चेकरी  निघून गेले. 

धोकादायक शाळा इमारतींची तपासणी कराजिल्ह्यात इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे. मिळेल तेवढ्या जागांवर इमारती बांधून या शाळा पालकांना आकर्षित करीत असल्या, तरी दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडल्यास यापैकी अनेक शाळांमध्ये संकटकाळी सहज बाहेर पडण्याचा मार्ग नाही, अशा धोकादायक शाळा इमारतींची तपासणी करून गटशिक्षण अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत शिक्षणाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करावा. त्या शाळांवर शिक्षणाधिकारी कारवाई करतील, असा ठराव स्थायी समिती सदस्य तथा शिवसेनेचे गटनेते अविनाश गलांडे यांनी मांडला.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदfundsनिधीPoliticsराजकारण