शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

‘सीफार्ट’ प्रयोगशाळेतील यंत्रे धूळखात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:15 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मध्यवर्ती सुविधा केंद्रातील (सीएफसी) कोट्यवधी रुपयांची यंत्रे प्रयोग, सराव करण्यासाठी संशोधक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचे साकडे संशोधक विद्यार्थ्यांच्या रिसर्च फोरमने कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांची भेट घेऊन केली आहे.

ठळक मुद्देविद्यापीठ : संशोधक विद्यार्थ्यांच्या वापरासाठी खुले करण्याचे कुलगुरूंना साकडे

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मध्यवर्ती सुविधा केंद्रातील (सीएफसी) कोट्यवधी रुपयांची यंत्रे प्रयोग, सराव करण्यासाठी संशोधक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचे साकडे संशोधक विद्यार्थ्यांच्या रिसर्च फोरमने कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांची भेट घेऊन केली आहे.विद्यापीठाच्या ‘सीएससी’ केंद्रात तत्कालीन कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांच्या यंत्रांची खरेदी करण्यात आली आहे. ही यंत्रे विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थ्यांसाठी संशोधन करण्यास उपलब्ध करून देण्याचा निर्णयही तेव्हा घेण्यात आला होता. मात्र, मागील काही वर्षांपासून ही सर्व यंत्रे धूळखात पडून आहेत. या यंत्रांच्या वापर विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांना करण्यास मिळावा, यासाठी रिसर्च फोरमच्या विद्यार्थ्यांनी दोन दिवसांपूर्वी सीएफसीला भेट दिली. तेव्हा त्याठिकाणी सीएफसीचे संचालक डॉ. सतीश पाटील यांची अनुपस्थिती होती, तर त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली असता, ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची यंत्रे उपलब्ध असून, ती चालविण्यासाठी तंत्रकुशल व्यक्तीच नाही. ज्या प्राध्यापकांना चालविता येतात, त्यातील दोन-तीन जण स्वत:चे काम करून घेतात. त्यानंतर कोणीही येत नसल्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांची भेट घेतली. यावेळी सर्व समस्या कुलगुरूंना सांगण्यात आल्या. अत्याधुनिक उपकरणे असूनही विद्यार्थ्यांना त्यावर संशोधन करता येत नसेल, तर कशासाठी ही यंत्रे खरेदी करण्यात आली, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेश करपे, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. राहुल म्हस्के, डॉ. शंकर अंभोरे, अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे आदींनी संशोधक विद्यार्थ्यांची मागणी उचलून धरत सर्व यंत्रे विद्यार्थ्यांच्या वापरास उपलब्ध झाली पाहिजेत, अशी भूमिका मांडली. यानंतर कुलगुरू येत्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यंत्रे हातळणाºया व्यक्तीची नेमणूक करण्यासाठी मंजूर घेऊन हा विषय मार्गी लावणार असल्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना देण्यात आले. यावेळी फोरमचे प्रमुख निखिल चव्हाण, बालाजी मुळीक, संदीप वाघ, चेतन जाधव, दीपक आहेर, अमोल निपटे, अजय मुंडे, सचिन गिराम, प्रसाद देशमुख, अजय पवार, अरुण गवारे, विष्णू बारोटे आदी संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.या महागड्या उपकरणांचा समावेशविद्यापीठातील सीएफसी केंद्रात डीटीए-टीजी सिस्टीम, एलओएन क्रोमाटोग्राफी, एक्स प्रो डिफ्राक्टोमेटर, ईडीएस मायक्रो अ‍ॅनालिसिस सिस्टीम, स्कॅनिग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, एलसी-एमएस/एमएस, मायक्रोवेव्ह सिस्टीम, सुपरक्रिटिकल फ्लड एक्ट्राक्शन सिस्टीम, एचपीटीएलसी, वॉटर प्युरीफिकेशन्स सिस्टीम या यंत्राचा समावेश आहे.चौकट,विद्यापीठ विकास मंचच्या बैठकांचे केंद्रसीएफसी इमारतीमध्ये असलेली यंत्रे धूळखात पडून आहेत. त्याचा वापर विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी संचालक डॉ. सतीश पाटील यांनी पावले उचलली नाहीत. मात्र, याच ठिकाणी विद्यापीठ विकास मंच, भाजपाच्या संबंधित पदाधिकारी, नेत्यांच्या बैठका रात्री उशिरापर्यंत नियमितपणे होतात. त्या बंद करून विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याकडे संचालकांनी लक्ष द्यावे, अशी मागणी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेश करपे यांनी केली. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रuniversityविद्यापीठ