शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

१० पटांच्या खालील शाळांना लागणार टाळे; औरंगाबाद जिल्ह्यातील ६२ शाळा शासनाच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 20:02 IST

शासनाच्या या धोरणामुळे गाव तिथे शाळा आणि सर्वांना शिक्षण ही योजना कालबाह्य ठरणार आहे.

ठळक मुद्देगेल्या दशकापासून राज्य सरकारने २० पटांखालील शाळा बंद करण्याचे धोरण सुरू केले आहे. अलीकडे काही महिन्यांपासून १० पटांखालील शाळांची माहिती राज्य स्तरावर संकलित करण्याचे काम

औरंगाबाद : राज्यात १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या तब्बल ४ हजार ६९० शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, त्यात शैक्षणिक गुणवत्तेत राज्यात आघाडी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील ६२ शाळा रडारवर आहेत. 

तत्कालीन राज्य सरकारचे तुघलकी धोरण विद्यमान महाविकास आघाडी सरकारने हाती घेतल्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. शासनाच्या या धोरणामुळे गाव तिथे शाळा आणि सर्वांना शिक्षण ही योजना कालबाह्य ठरणार आहे. गेल्या दशकापासून राज्य सरकारने २० पटांखालील शाळा बंद करण्याचे धोरण सुरू केले आहे.  तेव्हा या धोरणाविरोधात  राज्यभर रोष उमटला. शिक्षक संघटनांनी आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचा हा डाव हाणून पाडला. त्यातच निवडणुका आल्या आणि शासनाला आपला निर्णय गुंडाळावा लागला होता.

अलीकडे काही महिन्यांपासून १० पटांखालील शाळांची माहिती राज्य स्तरावर संकलित करण्याचे काम वेगाने सुरू असून, जवळजवळ पूर्ण झाले आहे. शासनाच्या नव्या धोरणाने १० पटांखालच्या सप्टेंबर २०१७ च्या पटसंख्येनुसार राज्यातील तब्बल ४,६९० शाळांची यादी तयार करण्यात आली आहे. या शाळा आता बंद करण्याबाबत नुकतीच शिक्षण सचिवांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन अशा शाळांचा जिल्हानिहाय आढावा घेतला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ६२  शाळा बंदच्या उंबरठ्यावर आहेत. यामध्ये औरंगाबाद तालुक्यातील- ५, फुलंब्री- ७, सिल्लोड- २३, सोयगाव- १, कन्नड- १६, गंगापूर- ३, वैजापूर- ५ आणि पैठण तालुक्यातील २ शाळांचा समावेश आहे. यातील सर्वाधिक वस्तीशाळा आहेत. विशेष म्हणजे, सद्य:स्थितीत ज्या शाळेची पटसंख्या १० पेक्षा जास्त आहे. अशा काही शाळांचाही यादीत समावेश आहे. 

गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून आढावा घेणारयासंदर्भात प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एस.पी. जायस्वाल यांनी सांगितले की, दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर शिक्षक तैनात करणे परवडणारे नाही. अशा शाळांतील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत पाठवले जाणार असून, जाण्या-येण्याची असुविधा असेल, तर अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना नेण्या- आणण्यासाठी लागणाऱ्या वाहनांचे भाडे शासन देणार आहे. ही यादी जुनी असून, लॉकडाऊन उघडल्यानंतर गटशिक्षण अधिकाऱ्यांमार्फत अशा शाळांचा आढावा घेतला जाणार आहे.

या धोरणामुळे वाड्या- वस्त्यांवरील मुले शिक्षणापासून वंचित राहून शिक्षण हक्क अधिनियम २००९ चे उल्लंघन होणार आहे. या मुलांचा शिक्षणाचा मूलभूत अधिकार शासन हिरावून घेऊ शकत नाही. वस्ती तिथे शाळा असलीच पाहिजे. यासाठी आता जागरूक राहून शिक्षण वाचवा आंदोलनाची बांधणी पालकांकडूनच होणे गरजेचे आहे, असे शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष उदय शिंदे, राज्य सरचिटणीस  विजय कोंबे, विजय साळकर, रंजित राठोड, नितीन नवले, श्याम राजपूत यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीzp schoolजिल्हा परिषद शाळाAurangabadऔरंगाबाद