शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यातील पाचवी ते नववीपर्यंतच्या शाळा २० मार्चपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 18:23 IST

corona virus जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात ४९ शाळांतील ६१ शिक्षक कोरोनाग्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देशिक्षक कोरोनाग्रस्त होत असल्याने घेतला निर्णय५० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिर्वाय

औरंगाबाद : जिल्ह्यातील (मनपा क्षेत्र वगळून) पाचवी ते नववीपर्यंतच्या शाळा आणि अकरावीचे वर्ग सुरू असलेली महाविद्यालये २० मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश प्र. जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी गुरुवारी जारी केले आहेत.

जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात ४९ शाळांतील ६१ शिक्षक कोरोनाग्रस्त झाले आहेत. त्यामुळे काही शाळा बंद कराव्या लागल्या होत्या. दहावी आणि बारावी इयत्तेचे वर्ग सोडून पाचवी ते नववी आणि अकरावीचे वर्ग बंद करण्याबाबत गुरुवारी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद सीईओ डॉ. मंगेश गोंदावले यांच्यात बैठक झाली. त्या बैठकीनंतर शाळा बंद करण्याबाबत निर्णय झाला. शिक्षकांना दर आठवड्याला आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढतेच आहे, शिवाय शिक्षकांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा-महाविद्यालात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्यास या संस्था चार दिवस बंद ठेवण्याचे आदेशात म्हटले आहे.

५० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिर्वायकोरोनामुळे जरी ५ वी ते ९ आणि अकरावी पर्यंतचे वर्ग भरणार नसले तरी शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती अनिवार्य राहणार आहे. तसे सगळेच शिक्षक उपस्थितीत असतात. जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थी व इतर अभियान सुरू आहेत. त्या कामासाठी शिक्षक आहेत, त्यामुळे त्यांना कामावर यावे लागणार आहे, असे प्र.जिल्हाधिकारी गव्हाणे यांनी सांगितले.

जिल्ह्यात शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी असे२२१८ पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा आहेत. त्यामध्ये ३ लाख ३८ हजार ७५३ विद्यार्थी आहेत. तर नववी ते बारावी २ लाख ६७ हजार ७१९ विद्यार्थी आहेत. यातील नववी आणि अकरावीचे वर्ग भरणार नाहीत. त्यांना आॅनलाईन शिक्षणाचा पर्याय असणार आहे. ७ हजार ६२३ शिक्षक कार्यरत आहेत. दहावी इयत्तेमध्ये ६५ हजार ११ तर बारावीमध्ये ५५ हजार १७७ विद्यार्थी असून, या विद्यार्थ्यांचे वर्ग नियमित सुरू राहणार आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा