शहरं
Join us  
Trending Stories
1
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
2
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
3
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
4
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
5
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
6
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
7
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
8
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
9
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
10
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
11
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
12
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
13
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
14
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
15
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
16
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
17
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
18
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
19
‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
20
मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान भोसरीत इमारतीवर आग; स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली आग
Daily Top 2Weekly Top 5

शालेय शिक्षण विभागाचा यूटर्न; शाळांची संचमान्यता जुन्याच नियमानुसार होणार

By राम शिनगारे | Updated: August 21, 2025 19:07 IST

शालेय शिक्षण विभागाची आणखी एका निर्णयात सपशेल माघार

छत्रपती संभाजीनगर : शालेय शिक्षण विभागाकडून निर्णय घेतल्यानंतर त्यातून पुन्हा माघार घेण्याचे प्रकार वाढले आहे. शाळांची संचमान्यता ३१ जुलैच्या पटसंख्येनुसार करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला राज्यभरातील संस्थाचालकांसह शिक्षक आमदारांनी विरोध केल्यानंतर पूर्वीच्या निर्णयाप्रमाणे संचमान्यता ३० सप्टेंबरच्या पटसंख्येनुसारच करण्याचे आदेश प्राथमिकचे शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक व उच्च माध्यमिकचे महेश पालकर यांनी मंगळवारी (दि. १९) काढले.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाला यावर्षी घेतलेल्या अनेक निर्णयात माघार घ्यावी लागली आहे. त्यात गणवेशाचे वाटप, पुस्तकातील वह्याची पाने, तिसरी भाषा हिंदी विषयीचा निर्णय, गुणपत्रिकांवर प्रवर्गाचा उल्लेखासह इतर निर्णयांचा समावेश आहे. त्याचवेळी मंत्रालयस्तरावरून शाळांची संचमान्यता ही ३१ जुलै रोजीच्या पटसंख्येवरून करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला होता. त्या निर्णयाला राज्यभरातील शिक्षक संघटना, संस्थाचालकांच्या संघटनांनी विरोध सुरू केला. विधानपरिषदेतील शिक्षक आमदारांनी हा प्रश्न लावून धरला होता. शालेय शिक्षण विभागाने पुन्हा एकदा माघार घेत संचमान्यता ३० सप्टेंबरच्या पटसंख्येनुसारच घेण्याचा निर्णय घेतला आहे.

प्राथमिक व माध्यमिकचे शिक्षण संचालक शरद गोसावी आणि महेश पालकर यांनी राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश देणारे पत्र काढले आहे. या पत्रानुसार ३० सप्टेंबर रोजी युडायसवरती आधार वैधता असलेल्या विद्यार्थ्यांचीच पटसंख्या ग्राह्य धरून पटसंख्या करण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयासाठी मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आ. विक्रम काळे, शिक्षण संस्थाचालक महामंडळाचे प्रा. मनोज पाटील यांच्यासह इतरांनी पाठपुरावा केला होता.

शाळांना पदे वाचविण्यासाठी मदत होणारशाळांच्या पटसंख्येच्या आधारावरच शिक्षकांच्या पदांना मंजुरी देण्यात येते. प्रत्येक शाळांना शिक्षकांची पदे वाचविण्याचे मोठे आव्हान असते. जर आवश्यक तेवढी पटसंख्या नसेल तर शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरविण्यात येतात. ३१ जुलै रोजी पटसंख्येनुसार संचमान्यता झाली असती, तर शेकडो शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरण्याचा धाेका होता. आता ३० सप्टेंबरपर्यंत आवश्यक तेवढ्या विद्यार्थ्यांची पटसंख्या दाखविण्यात येते. पटसंख्या मंजुरीनंतर पुन्हा काही विद्यार्थ्यांना इतर शाळेत पाठविले जाते, असा प्रकार सर्रासपणे करण्यात येत आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरzp schoolजिल्हा परिषद शाळा