शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

औरंगाबादेत परवाने निलंबित केल्यानंतरही स्कूल बस सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 7:27 PM

आरटीओ कार्यालयाने १०६ स्कूलबसचे परवाने चार महिन्यांसाठी निलंबित केले आहेत. या कारवाईनंतरही बसमालकांनी आरटीओ कार्यालयाकडे पाठ फिरविली आहे.

ठळक मुद्देपरवाने निलंबित केलेल्या बस रस्त्यावर दिसल्यावर जप्त केल्या जाणार आहेत. त्यासोबतच संबंधित पत्त्यावर जाऊनही ओढून आणल्या जातील. जर वाहन चालविण्याच्या अवस्थेत नसेल, तर जागेवरच लॉक केले जाईल, असे प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रमेशचंद्र खराडे यांनी सांगितले.

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयाने १०६ स्कूलबसचे परवाने चार महिन्यांसाठी निलंबित केले आहेत. या कारवाईनंतरही बसमालकांनी आरटीओ कार्यालयाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे या बस रस्त्यावर धावत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून अपघाताला आमंत्रण मिळत असल्याने  त्या ओढून आणण्याची कारवाई आरटीओ कार्यालय करणार आहे.

एका स्कूलबसचे रस्त्यातच ब्रेक नादुरुस्त झाल्याची घटना सोमवारी आडूळजवळ घडली. यामध्ये चालकाच्या समयसूचकतेने २२ विद्यार्थी बालंबाल बचावले. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी महाराष्ट्र स्कूल बस अधिनियमनानुसार नियमांची पूर्तता करणे आवश्यक आहे; परंतु अनेक स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक होत नसल्याचा प्रकार १०६ स्कूल बसच्या परवाने निलंबनाच्या कारवाईमुळे समोर आला आहे. फिटनेससह इतर आवश्यक बाबी नसल्याने या बस रस्त्यावर चालविणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे आरटीओ कार्यालयाकडून तपासणी करून घेऊन आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे; परंतु या स्कूल बसचालकांनी त्यास ठेंगा दाखविला आहे. परवाने निलंबन केल्यानंतरही या स्कूल बसचालकांनी ‘आरटीओ’ कार्यालयाची पायरी चढली नाही. आरटीओ कार्यालयाच्या पथकाला या बस रस्त्यावर सापडतदेखील नाही. 

बस रस्त्यावर दिसल्यास जप्त करणारपरवाने निलंबित केलेल्या बस रस्त्यावर दिसल्यावर जप्त केल्या जाणार आहेत. त्यासोबतच संबंधित पत्त्यावर जाऊनही ओढून आणल्या जातील. जर वाहन चालविण्याच्या अवस्थेत नसेल, तर जागेवरच लॉक केले जाईल, असे प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रमेशचंद्र खराडे यांनी सांगितले.

कर्मचारी संख्या अपुरीआरटीओ कार्यालयाच्या पथकांना रस्त्यावर स्कूल बस सापडत नाहीत. त्यामुळे शाळांबरोबर करार संपल्याने, नादुरुस्तीसह अन्य कारणांमुळे परवाने निलंबित केलेल्या स्कूल बस रस्त्यावर चालत नसल्याचा अजब अंदाज वर्तविण्यात येत आहे. आरटीओ कार्यालयात या बसचे मालक कोण आहेत, पत्ता आदी माहितीची नोंद आहे. त्यावरून बस जप्तीची कारवाई होऊ शकते. परंतु कर्मचारी संख्या अपुरी असल्याचे कारण पुढे करून लवकरच जप्तीची कारवाई केली जाईल, असे आरटीओ अधिकार्‍यांनी सांगितले.

टॅग्स :SchoolशाळाRto officeआरटीओ ऑफीसBus DriverबसचालकStudentविद्यार्थी