शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी तीन हजारांपर्यत शिष्यवृत्ती; कागदपत्रे काय लागतात?

By राम शिनगारे | Updated: November 24, 2023 20:04 IST

शिष्यवृत्ती मंजूरी झाल्यानंतर संबंधित विद्यार्थिनीच्या थेट बँक खात्यात शिष्यवृत्ती जमा केली जाते.

छत्रपती संभाजीनगर : शाळेतून मुलींची गळती कमी व्हावी, दैनंदिन उपस्थिती १०० टक्के राहावी, यासाठी शासनाने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत ६०० रुपयांपासून ३ हजारांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी शाळांमधून समाजकल्याण विभागाकडे विद्यार्थिनींची माहिती पाठविण्यात येते. तेथून शिष्यवृत्ती मंजूरी झाल्यानंतर संबंधित विद्यार्थिनीच्या थेट बँक खात्यात शिष्यवृत्ती जमा केली जाते.

काय आहे सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती?सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ही पाचवी ते दहावीतील अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील मुलींना ही शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी दैनंदिन उपस्थिती अनिवार्य आहे. किमान ७५ टक्के उपस्थिती असल्यास पाचवी ते सातवीतील विद्यार्थिनींना ६०० रुपये दिले जातात. आठवी ते दहावीतील विद्यार्थिनीना १ हजार रुपये प्रतिवर्षाला दिले जातात.

एससींना ६००, तर इतरांना अडीच ते तीन हजारराज्य शासनाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवर्गातील विद्यार्थिनींना ६०० ते तीन हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येते. आदिवासी सुवर्ण महोत्सवी योजनेत विद्यार्थ्यांना १५०० हजार रुपये मिळतात. त्याशिवाय इतर शिष्यवृत्तीही ३ हजार रुपयांपर्यंत देण्यात येतात.

निकष काय?शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र, मुख्याध्यापकांचा संबंधित प्रवर्गाचा दाखल, शाळेतील ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे.

कागदपत्रे काय लागतात?राज्य शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनींना राष्ट्रीयीकृत बँकेत खाते, आधार कार्ड, मागील वर्षाचे गुणपत्रक ही कागदपत्रे आवश्यक असतात. ही सर्व माहिती शाळांमध्येच उपलब्ध असते. शाळांमधील शिक्षकाचीही माहिती जमा करून समाजकल्याण कार्यालयाकडे पाठवितात. त्याठिकाणी तपासणी करून संबंधितांना शिष्यवृत्ती मंजूर केली जाते.

योजनेचा लाभ घ्यावासर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत शिष्यवृत्तीसाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे नावे किंवा प्रस्ताव सादर करावीत. तसेच, जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा.- ओमप्रकाश रामावत, समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण