शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

शिष्यवृत्तीच्या आॅनलाईनचा घोळ संपेना; सरकारी वेबसाईट अद्याप बंदच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 13:45 IST

सरकारी यंत्रणेकडून वेबसाईटच अद्याप सुरू केलेली नाही

- साहेबराव हिवराळे 

औरंगाबाद : दरवर्षी शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला आॅगस्ट महिन्यात शिष्यवृत्तीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती, जमातीच्या इतर लाभार्थ्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती आॅनलाईन विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा व्हावी म्हणून आॅनलाईन व्यवस्था केली आहे; परंतु सरकारी यंत्रणेकडून ही वेबसाईटच अद्याप सुरू केलेली नाही. त्यामुळे यंदाही विद्यार्थ्यांना दिवाळीपूर्व शिष्यवृत्ती मिळण्याची अपेक्षा दुरावली आहे. 

शैक्षणिक सत्राच्या पहिल्या टप्प्यात शिष्यवृत्तीचे अर्ज दाखल करण्यासाठी महाविद्यालयात गर्दी असते, लाभार्थी विद्यार्थी महाविद्यालयातील कार्यालयात जाऊन दररोज विचारणा करीत असले तरी त्यांना अद्याप आॅनलाईन व्यवस्था सुरूच झालेली नाही. वेबसाईट सुरू झाल्यावर अर्ज भरता येणार आहेत, अशा सूचना केल्या जात आहेत. अनेक विद्यार्थी पालक व सामाजिक न्याय भवनात गतवर्षीच्या शिष्यवृत्ती व यंदाचे अर्ज सादर करण्याविषयी विचारपूस करताना दिसत आहेत. 

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर महाविद्यालयातून काही गैरप्रकार होऊ नये म्हणून हे पाऊल उचलले असले तरी विद्यार्थ्यांची परवड मात्र अद्याप थांबलेली नाही. गतवर्षीच्या शिष्यवृत्तीचा घोळ संपलेला नसल्याने यंदा शिष्यवृत्तीधारकांनी आॅनलाईन अर्ज भरावे कधी आणि त्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती येणार केव्हा, असा प्रश्न अनेक पालकांनी उपस्थित केला.   

ग्रामीण विद्यार्थ्यांची गैरसोय ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना   अडचणींना तोंड द्यावे लागत असल्यामुळे आॅनलाईन अर्जाची वेबसाईट सुरू करावी, अशी मागणी  भाऊसाहेब नवगिरे यांनी केली आहे.

प्रत्यक्ष अर्ज की आॅनलाईन ठरवा गतवर्षीच्या विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज भरून घेतले, त्यानंतरही प्रत्यक्ष अर्ज भरून घेतले या प्रक्रियेत ओबीसी, व्हीजेएनटीचे विद्यार्थी वंचित आहेत. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचीही फक्त ७० टक्केच शिष्यवृत्ती टाकून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय केली जात आहे. श्ौक्षणिक सत्रातील सप्टेंबरचा शेवटचा आठवडा सुरू असून, सामाजिक न्याय विभागाने दक्षता घेऊन पोर्टल त्वरित सुरू करून आॅनलाईन अर्ज भरून घ्यावे अन्यथा आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राहुल तायडे यांनी दिला. काही निवडक कॉलेजात आॅनलाईचा प्रयोग केला असून, रिपार्ट आल्यावर लवकरच आॅनलाईन सुरू होणार आहे, असे समाजकल्याण शिष्यवृत्ती विभागातील अधिकारी एस.एस. दडपे म्हणाले. 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीSC STअनुसूचित जाती जमातीStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्रState Governmentराज्य सरकारAurangabadऔरंगाबाद