शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

करोडोचा घोटाळा उघडकीस आणला पण मुख्यमंत्र्यांच्या गोटातील आमदारांसोबत जुळले नाही, मनपा प्रशासकांची बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 12:48 IST

नोव्हेंबर २०२२ पासून काही लोकप्रतिनिधींनी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या बदलीसाठी हालचाली सुरू केल्या होत्या. सहा महिन्यांच्या प्रयत्नांनंतर राजकीय मंडळींना मंगळवारी यश आले.

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या प्रशासकपदी शासनाने मंगळवारी वस्तू व सेवाकर सहआयुक्त जी. श्रीकांत यांची नेमणूक केली. २ ऑगस्ट २०२२ रोजी प्रशासक म्हणून रूजू झालेले डॉ. अभिजीत चौधरी यांना शहरातच जी. श्रीकांत यांच्या जागेवर नेमणूक देण्यात आली. डॉ. चौधरी यांच्या बदलीसाठी मागील सहा महिन्यांपासून राजकीय मंडळींकडून प्रयत्न करण्यात येत होते, हे विशेष.

महापालिकेत २०२० पासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. कोरोना संसर्गात उल्लेखनीय कामगिरी करणारे तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांची ऑगस्ट २०२२ मध्ये बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची नेमणूक केली होती. चौधरी यांनी पदभार घेतल्यानंतर महापालिकेच्या कामकाजात आमूलाग्र बदल सुरू केले. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी मेटाकुटीला आले होते. अनेकदा ते अधिकाऱ्यांशी न बोलता थेट कर्मचाऱ्यांशी संवाद साधत. पंतप्रधान आवास योजनेतील कंत्राटदाराची चोरी त्यांनी पकडली. त्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची ईडी चौकशी सुरू झाली. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले होते. जी-२० मध्ये शहर सौंदर्याला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम त्यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय आमदारांसोबत त्यांचे ट्युनिंग जुळले नाही. नोव्हेंबर २०२२ पासून काही लोकप्रतिनिधींनी त्यांच्या बदलीसाठी हालचाली सुरू केल्या होत्या. सहा महिन्यांच्या प्रयत्नांनंतर राजकीय मंडळींना मंगळवारी यश आले. विशेष म्हणजे डॉ. चौधरी हे सध्या ग्रीसमध्ये खासगी दौऱ्यावर आहेत.

लातूर जिल्हाधिकारी, जीएसटीत उल्लेखनीय कामजी. श्रीकांत २००९ बॅचचे आयएस अधिकारी असून, त्यांनी अलीकडेच लातूरला जिल्हाधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केले. त्यानंतर शासनाने त्यांना जीएसटी विभागात सहआयुक्त म्हणून नेमले. या ठिकाणीही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. जीएसटी विभागाने व्यापाऱ्यांसाठी राबवलेली अभय योजना, कर भरण्यासाठी केलेली सुलभ प्रक्रिया, वेळेवर परतावा असे अनेक उपक्रम यशस्विरीत्या राबविले. करसंकलनात भरीव वाढ केल्याबद्दल देशात अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा टीआयओएलचा ज्युरी ॲवाॅर्ड जी. श्रीकांत यांनी आपल्या विभागाला मिळवून दिला.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका