शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

माथाडी मंडळ वाचविण्यासाठी औरंगाबादमध्ये हमाल एकवटले; जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 6:17 PM

‘जिल्हास्तरीय माथाडी मंडळाची कार्यालय राहिलच पाहिजे’, ‘ कायद्या आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा’, ‘माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे’ असा आवाज बुलंद करीत जिल्ह्यातील सर्व हमाल,कष्टकरी एकवटले होते. या मोर्चात महिलांची संख्याही वाखाणण्याजोगी ठरली. 

औरंगाबाद : ‘जिल्हास्तरीय माथाडी मंडळाची कार्यालय राहिलच पाहिजे’, ‘ कायद्या आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा’, ‘माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे’ असा आवाज बुलंद करीत जिल्ह्यातील सर्व हमाल,कष्टकरी एकवटले होते. या मोर्चात महिलांची संख्याही वाखाणण्याजोगी ठरली. 

महाराष्ट्र हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने मंगळवारी राज्यभर एकाच दिवशीचा संप पुकारण्यात आला होता. यास जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळी १० वाजता मोर्चासाठी हमाल,कष्टकरी क्रांतीचौक येथे जपले होते. अनेकांच्या हातात लाल झेंडे होते तसेच दुसर्‍या हातात फलकही होते. जिल्ह्यातील माथाडी मंडळाचे अस्तित्व संपुष्टात येणार असल्याने सर्व हमाल संतापलेले होते. माथाडी कायद्याची प्रशासन काटेकोरपणे अंमलबजावणी करीत नाही आणि दुसरीकडे सरकार प्रत्येक जिल्ह्यात असलेले माथाडी मंडळाचे विलनीकरण करण्याचा घाट घालत असून यास आमचा विरोध आहे. जोपर्यंत निर्णय रद्द करीत नाही तोपर्यंत लढा चालूच ठेवणार असा निर्धार यावेळी मराठवाडा लेबर युनियनचे सरचिटणीस देविदास किर्तीशाही यांनी करताचा सर्वांनी सरकार विरोधी घोषणा देत त्यांना जोरदार पाठींबा दिला. मोर्चा  पैठणगेट, गुलमंडी,  सिटीचौक, सराफा रोड, चेलीपुरामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी महामंडळाच्या पाच पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मागण्याचे निवेदन दिले.  मोर्चाचे रुपांतर सभेत झाले, ‘हमसब एक है’ अशा घोषणा देत हमालांनी सुरुवातीपासून ते मोर्चा समाप्तीपर्यंतची आपली एकजूट कायम ठेवली. 

तर राज्यव्यापी बेमुदत बंदचा इशारा महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष सुभाष लोमटे यांनी राज्यशासनाला इशारा दिला की, ३६ माथाडी मंडळाच्या विलीनीकरण करुन एकच राज्यव्यापी मंडळ ठेवण्याचा निर्णय रद्द केला नाही तर येत्या काळात आम्ही बेमुदत बंद करू. कोणत्याही परिस्थिती आम्ही जिल्ह्यातील माथाडी मंडळे बंद करु देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

हमाल मापाडी महामंडळाचे म्हणणे१) माथाडी कायदा हमालांना सामाजिक सुरक्षा प्रदान करतो. २)राज्यातील ३६ माथाडी मंडळ रद्द करु नका.३) माथाडी कायद्याच्या अंमलबजावणी समितीमध्ये कामगार व मालक संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश करावा. ४) माथाडी कामगारांनी दिलेल्या तक्रारीचा निपटारा एका महिन्यात करावा.५) नोंदीत पण बेकायदेशीरपणे काढून टाकलेल्या माथाडींना पुन्हा कामावर घ्यावे. ६) मजुरीवरील किमान लेव्ही ४० टक्के करावी.