शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सावे यांना फेसबुकवरून जिवे मारण्याची धमकी देणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:29 IST

पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार अतुल मोरेश्वर सावे यांना एकाने फेसबुकवरून जिवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच सिटीचौक पोलिसांनी तडकाफडकी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. त्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया देणाऱ्या चार जणांना पोलिसांनी सहआरोपी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार अतुल मोरेश्वर सावे यांना एकाने फेसबुकवरून जिवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच सिटीचौक पोलिसांनी तडकाफडकी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. त्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया देणाऱ्या चार जणांना पोलिसांनी सहआरोपी केले.संभाजी भोसले (३८, रा. सिडको), असे धमकी देणाºया व्यक्तीचे नाव आहे. सिटीचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक डी. एस. सिनगारे म्हणाले की, आरोपी भोसले याने २३ जून रोजी सायंकाळी ६.३८ वाजता फेसबुकवर एक पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये त्याने ‘मी एका बीजेपी आमदाराचा खून करणार आहे. फडणवीस सरकारला माझे ओपन चॅलेंज आहे. जे फक्त ब्राह्मणांना प्रोटेक्शन देत आहे. थांबू शकत असाल तर मला थांबवा...’ असा मजकूर आहे. एवढेच नव्हे, तर भोसले याने अतुल सावे यांना अश्लील शिवीगाळ करणारी आणखी एक पोस्ट टाकली. या पोस्टला पाच जणांनी लाईक केले आणि चार जणांनी त्यावर कमेंट टाकली. कमेंटस् टाकणाºयांशी संगनमत करून ही धमकी दिल्याचे आ. सावे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तडकाफ डकी कारवाई करून आरोपी भोसले याला अटक केली. अश्लील शिवीगाळ करणे, जिवे मारण्याची धमकी देणे आणि आय.टी. अ‍ॅक्टनुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल के ल्याचे पोलीस निरीक्षक सिनगारे यांनी सांगितले. अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचेही ते म्हणाले.पोलिसांना निवेदनआ. सावे यांना फेसबुकवरून जिवे मारण्याची धमकी आल्याचे कळताच भाजप शिष्टमंडळाने रविवारी दुपारी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या निवेदनात फेसबुक अकाऊंटवर पोस्ट टाकणाºया आणि त्याला उत्तेजित करणाºयांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शिरीष बोराळकर, गणेश नावंदर, मंगलमूर्ती शास्त्री आणि नगरसेवक, पदाधिकाºयांची उपस्थिती होती. दरम्यान आ. सावे म्हणाले हा शहरातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न आहे. पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी.

टॅग्स :FacebookफेसबुकAurangabadऔरंगाबादAtul Saaveअतुल सावेArrestअटक