शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सत्तरांच्या पक्षांतराने शिवसेनेची जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 18:14 IST

भाजपच्या सत्ता स्वप्नांना लागणार ब्रेक 

ठळक मुद्देसत्तरांच्या पक्षांतराचे परिणाम अध्यक्षपद पुढेही देणार हुलकावणी 

- राम शिनगारे

औरंगाबाद : काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपऐवजी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यातील विविध समीकरणे बदलणार आहेत. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपने जि. प. अध्यक्षपदावर दावा केलेला असतानाच आता सत्तारांच्या प्रवेशाने शिवसेना जि.प.तील सत्ता स्वबळावर ताब्यात घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपच्या सत्ता स्वप्नांना ब्रेक लागणार असून, अध्यक्षपदाचा दावाही सोडून द्यावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार अंबादास दानवे यांना मतदान करण्यासाठी भाजपच्या जि. प. सदस्यांना वारंवार विनंती करावी लागली होती. तेव्हा सदस्यांनी जि.प.तील काँग्रेससोबतच्या युतीवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी शिवसेनेने आगामी जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला सोबत घेण्याचा शब्द दिला होता. जि.प.तील सर्वात मोठा पक्ष म्हणून अध्यक्षपदावर भाजपने दावाही केला. मात्र राज्य शासनाने विधानसभा निवडणुका झाल्यानंतर जि.प. अध्यक्षपदाच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांना तीन महिन्यांचा अधिक कालावधी मिळाला आहे. जि.प. मध्ये शिवसेनेचा अध्यक्ष आणि सत्तार समर्थक काँग्रेसचे केशवराव तायडे पाटील हे उपाध्यक्ष आहेत. सभापती पदेही दोन्ही पक्षांनी आपसात वाटून घेतलेली आहेत. सर्वात मोठ पक्ष असूनही विरोधात बसावे लागल्याचे शल्य भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आजही आहे. त्यांनी वारंवार बोलूनही दाखविले.

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेससोबत असलेली युती तोडण्याची भाजपची मागणी मान्य केली होती. त्याची अंमलबजावणी येत्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीत करण्याचे आश्वासन दिले होते. संभाव्या युतीनुसार भाजपचे संख्याबळ अधिक असल्यामुळे अध्यक्षपदाचा दावा अधिक होता. मात्र आत काँग्रेसचे आ. सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशामुळे त्यांचे समर्थक जि.प.सदस्यही शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ भाजपपेक्षा अधिक होणार आहे. याविषयी उपाध्यक्ष केशवराव तायडे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सत्तार यांच्यासोबत काँग्रेसच्या १६ सदस्यांपैकी ११ जण असल्याचे सांगितले. तसेच माजी आमदार कल्याण काळे यांचे समर्थक असलेल्या काँग्रेसच्या उर्वरित ५ सदस्यांनाही शिवसेनेचे वावडे नाही. त्यामुळे सत्तास्थाने ‘जैसे थे’ राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या १५ दिवसांमध्ये जि.प.च्या राजकीय वर्तुळात अधिक घडामोडी घडतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

असा असणार संख्याबळाचा खेळजि. प. सदस्यांची एकूण संख्या ही ६२ एवढी आहे. यामध्ये भाजपचे २३, शिवसेना १८, काँग्रेस १६, राष्ट्रवादी काँग्रेस ३ (उदयसिंग राजपूत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांच्या जि.प. सदस्य पत्नी शिवसेना समर्थक आहेत.), मनसे १ आणि रिपाइं डेमोक्रॅटिक १, असे संख्याबळ आहे. यातील आ. सत्तार समर्थक काँग्रेसच्या ११ सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास शिवसेनेचे संख्याबळ ३० वर पोहोचत आहे. तर बहुमतासाठी ३२ सदस्यांची आवश्यकता आहे. काँग्रेसचे उर्वरित ५ सदस्यही शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपच्या सत्ता मिळविण्याच्या स्वप्नाला सुरुंग लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेस