शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

सातारा येथील दोन कि.मी. रस्त्यावर १६० खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 13:54 IST

सातारा पोलीस ठाणे ते गावात जाणार्‍या रस्त्याची चाळणी झाली आहे. रस्ता उखडल्याने दोन ते अडीच कि.मी. रस्त्यावर तब्बल १६० ठिकाणी खड्डे पडले आहेत.

औरंगाबाद : सातारा पोलीस ठाणे ते गावात जाणार्‍या रस्त्याची चाळणी झाली आहे. रस्ता उखडल्याने दोन ते अडीच कि.मी. रस्त्यावर तब्बल १६० ठिकाणी खड्डे पडले आहेत. पादचार्‍यांसह वाहनधारकांनाही या रस्त्यावरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

सातारा परिसरातील पोलीस ठाणे ते मूळ गाव या रस्त्याची अवस्था वाईट झाली आहे. मागील १५-२० वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. नवीन वसाहत व मूळ गावाला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. याच रस्त्यावर पोलीस ठाणे आहे. गावातच प्रसिद्ध खंडोबा मंदिर, मनपा वॉर्ड कार्यालय आहे. एसआरपी केंद्राकडे जाण्यासाठीही हाच मुख्य रस्ता आहे. जास्त रहदरी असल्याने रस्ता अल्पावधीतच खराब झाला. दरम्यानच्या काळात स्थानिक प्रशासनाने मुरूम टाकून रस्त्यावरील खड्डे बुजविले; पण दोन-चार महिन्यांतच तो खराब झाला. सद्य:स्थितीत रस्ता अनेक ठिकाणी उखडला असल्याने रस्त्याची अवस्था फारच वाईट झाली आहे. रस्त्यावर खडी पसरून जागजागी खड्डे पडले आहेत. तसेच रस्ता उखडला गेल्याने रस्त्याच्या मधोमध ड्रेनेजचे चेम्बरही उघडे पडले आहेत. या दोन ते अडीच कि.मी. रस्त्यावर छोटे-मोठे मिळून तब्बल १६० खड्डे पडले आहेत. शिवाय रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी राहत असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. या रस्त्यावरून नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांची सतत ये-जा असते. सायंकाळच्या वेळी तर रस्ता पूर्ण जाम होतो.  खड्डे व खडीमुळे वाहनधारकांना आदळ-आपटीचा त्रास सहन करावा लागत आहे. 

लवकर रस्ता करावा  रस्त्याची वाईट अवस्था असून, रस्ता उखडला आहे. हा मुख्य रस्ता असल्याने पादचार्‍यांसह वाहनधारकांनाही त्रास होत आहे. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन मनपाने रस्ता लवकर करावा; अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरतील, असे सोमीनाथ शिराणे यांनी सांगितले.

मुलांना मणक्यांचा त्रासमागणी करूनही रस्ता दुरुस्त केला जात नाही. विद्यार्थ्यांना खड्ड्यांतून ये-जा करावी लागत असल्याने लहान वयातच मणक्यांचा त्रास होत आहे, असे राहुल शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षाSatara areaसातारा परिसर