शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

उचापतीमुळे सरपंचपती अडकला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 23:45 IST

खरेदी केलेल्या जमिनीची नोंद ८ अ चा उतारा घेण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सरपंचपतीच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. भाऊसाहेब तुकाराम गोजरे (३६, रा. वडजी, ता. पैठण) असे आरोपीचे नाव आहे.

ठळक मुद्देपाचोड ठाण्यात गुन्हा दाखल : जमिनीची नोंद घेण्यासाठी मागितली लाच

औरंगाबाद : खरेदी केलेल्या जमिनीची नोंद ८ अ चा उतारा घेण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सरपंचपतीच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. भाऊसाहेब तुकाराम गोजरे (३६, रा. वडजी, ता. पैठण) असे आरोपीचे नाव आहे.तक्रारदार याने वडजी येथे जमीन खरेदी केली होती. या जमिनीची नोंद नमुना नं. ८ अ च्या उताºयाला घेण्यासाठी तक्रारदाराने ग्रामसेवकाकडे विनंती केली; परंतु ग्रामसेवक यांनी सरपंच यांना विचारल्यानंतर नोंद होईल, असे सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने सरपंचपती भाऊसाहेब तुकाराम गोजरे याच्याकडे विचारणा केली. त्यावेळी भाऊसाहेब गोजरे याने नोंद घेण्यासाठी ५ हजार रुपये लागतील, असे सांगितले. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यासाठी दि. २१ नोव्हेंबर रोजी पंचासमक्ष तक्रारदाराला पाठविण्यात आले. वडजी येथील ग्रामपंचायत कार्यालयात भाऊसाहेब गोजरे याने नोंद करण्याचे ग्रामसेवकाला सांगतो त्यासाठी ५ हजार रुपये लागतील, असे म्हणून लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.लाच स्वीकारण्याची मागणी केलीत्यानंतर कार्यालयातच सापळा रचण्यात आला; परंतु गोजरे याला याचा संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नाही; परंतु गोजरे याने लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्या विरुद्ध मंगळवारी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या पथकाने केली कारवाईही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक शंकर जिरगे, पोलीस उपाधीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक बाळा कुंभार, पोलीस निरीक्षक गणेश धोक्रट, पोहेका. विजय बांम्हदे, गणेश पंडुरे, पोलीस नाईक भीमराज जिवडे, शिपाई सुनील पाटील, चालक संदीप चिंचोले यांनी पार पाडली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागAurangabadऔरंगाबाद