सरस्वती भुवन अंतिम फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:51 AM2018-01-12T00:51:11+5:302018-01-12T00:51:21+5:30

औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित ३८ व्या गादिया चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या उपांत्य फेरीत अल्फोन्सा इंग्लिश स्कूलने स्वामी विवेकानंद अकॅडमीचा ३७ धावांनी, तर सरस्वती भुवन प्रशालेने महाराष्ट्र पब्लिक स्कूलचा ८ गडी राखून पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली.

Saraswati Bhuvan in the final round | सरस्वती भुवन अंतिम फेरीत

सरस्वती भुवन अंतिम फेरीत

googlenewsNext

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित ३८ व्या गादिया चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या उपांत्य फेरीत अल्फोन्सा इंग्लिश स्कूलने स्वामी विवेकानंद अकॅडमीचा ३७ धावांनी, तर सरस्वती भुवन प्रशालेने महाराष्ट्र पब्लिक स्कूलचा ८ गडी राखून पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली. सरस्वती भुवन हायस्कूल आणि अल्फोन्सा इंग्लिश स्कूल यांच्यात उद्या, शुक्रवारी एडीसीएच्या मैदानावर सकाळी १० वाजता अंतिम सामना रंगणार आहे.
अल्फोन्सा इंग्लिश स्कूलने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकांत ८ बाद १११ धावा केल्या. त्यांच्याकडून जहांगीर हकीम याने ३६ चेंडूंत ४१ आणि यश हार्दे याने २१ धावा केल्या. स्वामी विवेकानंद अकॅडमीकडून देवश्री भावसार याने १५ धावांत ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात स्वामी विवेकानंद अकॅडमीचा संघ ७४ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून आनंद साळवेने १८ व रोहित बनसोडेने १७ धावा केल्या. अल्फोन्साकडून निशांत सुरवसेने ११ धावांत ३ गडी बाद केले. यश साळवेने २, तर जहांगीर हकीम, उत्सव सिन्हा व सौरव चौधरी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
दुसºया उपांत्य फेरीत महाराष्ट्र पब्लिक स्कूलने १५ षटकांत ६ बाद ९९ धावा केल्या. त्यांच्याकडून शशिकांत भडगळे याने ३३ चेंडूंत ८ चौकारांसह नाबाद ५२ व कुणाल शिंदेने १९ धावा केल्या. सरस्वती भुवनकडून चैतन्य वाघमारे, मंदार कुलकर्णी, आदित्य राजहंस व प्रसाद कुलकर्णी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात सरस्वती भुवन प्रशालेने विजयी लक्ष्य फक्त २ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून आदित्य राजहंसने नाबाद ३०, कृष्णा पवारने २७ व चैतन्य वाघमारे याने नाबाद २६ धावा केल्या. महाराष्ट्र पब्लिक स्कूलकडून अतिश लोखंडे व शशांक सांगळे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

Web Title: Saraswati Bhuvan in the final round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.