शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

संकल्प ४५ हजार कोटींचा; मात्र मंजुरी ९ हजार कोटींच्या कामांना, सरकारनं काय दिलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 06:49 IST

मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीत घोषणांचा पाऊस, हिंगोलीला वैद्यकीय महाविद्यालय

छत्रपती संभाजीनगर : येथे शनिवारी झालेल्या बहुचर्चित मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाडा विकासाच्या तब्बल ४५ हजार कोटींच्या भरघोस कामांचा संकल्प करण्यात आला. प्रत्यक्षात नऊ हजार कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली. बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअजित पवार यांनी पत्रपरिषदेत निर्णयांची माहिती दिली. मराठवाड्यातील अकरा सिंचन प्रकल्प आणि त्यासाठी १३ हजार ६७७ कोटी सुधारित खर्चासही या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध संस्था, संघटनांनी मोर्चे, निवेदनांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

मराठवाड्यात ११ जलसंपदा प्रकल्पांना मान्यता. १३ हजार ६७७ कोटींचा वाढीव खर्चग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी १०७६ कोटींची वाढीव तरतूद. मराठवाड्यातील १२ लाख  महिलांना लाभ.अंबाजोगाईत लाल कंधारी, देवणी देशी गोवंशाचे जतनछत्रपती संभाजीनगरला फिरत्या भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेची स्थापनाहिंगोलीमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालय. ४८५ कोटी खर्चास मान्यताराज्यातील वरिष्ठ निवासी डॉक्टर्सना ८५ हजार रुपये दरमहा मानधन. १२.८५ कोटीसौरऊर्जा कुंपणासाठी रक्कम थेट हस्तांतरित होणारसमग्र शिक्षातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना १०% मानधनवाढराज्यातील शाळा दत्तक घेता येणार. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी निर्णयसिल्लोड येथे दिवाणी न्यायालयपरळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय, सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्रसोयगाव तालुक्यात शासन अनुदानित कृषी महाविद्यालयनांदेड येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालयधाराशिव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयजालना येथे आयटीआय इन्क्युबेशन सेंटर स्थापणार, १० कोटीस मान्यतागोर (बंजारा) समाज भवनासाठी नवी मुंबईत भूखंडराज्यात ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण’ अभियान२००५ पूर्वी नियमित पदावर अस्थायी सेवेतील कार्यरत आणि २००९ मध्ये नियमित सेवेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मॅटच्या आदेशाचा लाभ

या प्रकल्पांना मंजुरी अंबड प्रवाही वळण योजना (ता. दिंडोरी), निम्न दुधना प्रकल्प (ता. सेलू, जि. परभणी), जायकवाडी टप्पा-२ (ता. माजलगाव, जि. बीड), बाभळी मध्यम प्रकल्प (जि. नांदेड), वाकोद मध्यम प्रकल्प, (ता. पुसद, जि. यवतमाळ), पोटा उच्च पातळी बंधारा (ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली),जोडपरळी उच्च पातळी बंधारा (ता. वसमत, जि. हिंगोली),पिंपळगाव कुटे उच्च पातळी बंधारा (ता. वसमत, जि. हिंगोली), ममदापूर उच्च पातळी बंधारा (ता. पूर्णा, जि. परभणी), उनकेश्वर उच्च पातळी बंधारा (ता. किनवट, जि. नांदेड).

१४ हजार कोटींची तरतूद ही थापमराठवाडा वॉटर ग्रीड योजनेसाठी १४ हजार कोटी रुपयांची घोषणा म्हणजे निव्वळ थाप आहे. या योजनेच्या सर्वेक्षण करण्यासाठी ५० कोटी रुपये देण्यात आले आहे. अद्याप सर्वेक्षणच झाले नाही, तर १४ हजार कोटी रुपयांची तरतूद कोणत्या कामासाठी केली, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत केला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार