शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील चंदन जाते कर्नाटक, अमरावतीला; गाभ्याच्या प्रतवारीनुसार ठरतो भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 19:32 IST

गेल्या काही वर्षापासून तस्कर वेगवेगळ्या वसाहती आणि शासकीय कार्यालये, अधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या आवारातील चंदनाच्या झाडांना लक्ष करीत आहेत.

ठळक मुद्देऔरंगाबाद तालुक्यातील आडगाव माऊली येथील काही लोक यात गुंतलेले आहेत. कटरच्या साहाय्याने अवघ्या पाच ते पंधरा मिनिटात २५ वर्ष जुने झाड आडवे करून तुकडे

औरंगाबाद : शहरातील विविध वसाहती आणि शासकीय कार्यालये, अधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या आवारातून चंदनाची झाडे चोरटे पळवीत आहेत. चंदनाची झाडे तोडून नेणाऱ्या टोळ्या आडगाव माउली, सिल्लोड आणि भोकरदन तालुक्यातील आहेत. तोडलेल्या चंदनाचे लाकूड   गाभ्याच्या प्रतवारीनुसार १ हजार ६०० रुपये ते ३ हजार रुपये प्रति किलोने विक्री होते. कर्नाटक आणि अमरावती येथे चंदन ठोक दराने खरेदी केले जाते. त्यामुळे उपरोक्त शहरात चंदन विक्रीसाठी नेले जाते अशी माहिती सूत्राने दिली.

गेल्या काही वर्षापासून तस्कर वेगवेगळ्या वसाहती आणि शासकीय कार्यालये, अधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या आवारातील चंदनाच्या झाडांना लक्ष करीत आहेत. औरंगाबाद तालुक्यातील आडगाव माऊली येथील काही लोक यात गुंतलेले आहेत. लाकूड तोडण्यात तरबेज असलेले येथील चंदन तस्कर बॅटरीवर चालणाऱ्या कटरच्या साहाय्याने अवघ्या पाच ते पंधरा मिनिटात २५ वर्ष जुने झाड आडवे करून तुकडे तुकडे करतात. काळ्या बाजारात चंदनाच्या खोडातील गाभ्याला सर्वोत्तम भाव मिळत असल्यामुळे तस्कर जास्तीत जास्त जुने आणि जाड बुंध्याचे झाड तोडून खोड कापून नेतात. जवाहरनगर, पुंडलिकनगर आणि सिटी चौक  पोलिसांनी चंदन तस्करांना अटक केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक राज्यात चंदनापासून अगरबत्ती, साबण, अत्तर आणि अन्य वस्तू तयार करणारे कारखाने आहेत. शिवाय अमरावती येथील काही आरा मशिनवाले चोरट्या मार्गाने चंदन खरेदी करतात.  विविध उद्योगात  चंदनाला असलेली मागणी जास्त आहे.  यामुळे चंदन चोरी करणाऱ्याकडून मोठे तस्कर  चंदन लाकूड खरेदी करुन कर्नाटक  आणि अमरावती येथे चोरट्या मार्गाने विक्रीसाठी नेतात. 

कार, भाजीपाल्याच्या वाहनांतून तस्करीवन विभागाच्या परवानगीशिवाय चंदनाचे झाड तोडणे आणि वाहतूक करण्यास मनाई आहे. चोरट्या मार्गाने चंदन तस्कर झाडे चोरून नेतात. तीन वर्षात सुमारे ४० झाडे चोरट्यांनी पळविली. त्याची वाहतूक कार अथवा  भाजीपाला  वाहतूक  करणाऱ्या वाहनातून होते. चंदनाच्या लाकडाचे अत्यंत  लहान  तुकडे करून ही वाहतूक केली जाते. 

रेकी करून चंदन चोरी शहरातील आणि शेतकऱ्यांच्या बांधावरील तसेच जंगलात चंदनाचे झाड  कुठे आहेत, याबाबत चोरटे दिवसभर रेकी करतात. रात्रीच्या अंधारात पोलिसांची नजर चुकवून आणि कारवाईला न घाबरता चंदन चोरी करून हजारो रुपये कमाई करतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादtheftचोरी