शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
3
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
4
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
5
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
6
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
7
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
8
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
9
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
10
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
11
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
12
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
13
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
14
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
15
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
16
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
17
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य
18
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
19
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
20
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

रॉयल्टीची एकच पावती ५ दिवस वापरून वाळू उपसा; सरकारी यंत्रणेकडून महसूलला चुना?

By विकास राऊत | Updated: June 4, 2025 12:20 IST

जलजीवन, वाॅटरग्रीडसाठी दिलेल्या वाळू ठेक्यातून बेकायदेशीर उपसा, १० कोटींचा महसूल बुडाल्याचा संशय

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर, वैजापूर तालुक्यातील वॉटर ग्रीड व जलजीवन मिशन योजनेच्या कामासाठी शिवना नदीच्या पात्रातील सनव या राखीव वाळू पट्ट्यातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १० हजार ६०० ब्रास वाळू उपसण्याचा ठेका ६३ लाख ६० हजार रुपयांच्या रॉयल्टीने घेतला आहे. मात्र, योजनेच्या कामाची तालू शहरात येत असल्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करून शहरात विक्रीचा संशय बळावला आहे.

केवळ मनुष्य बळाच्या साहाय्याने वाळू उपसा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना, सध्या पट्ट्यामध्ये १० जेसीबी, २ पोकलेनद्वारे वाळू उपसण्याचा सपाटा सुरू आहे. १ मीटरपेक्षा जास्तीचे उत्खनन झाल्याची शक्यता असून प्राधिकरणासह, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गौण खनिज अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठ्यांनी डोळेझाक केली आहे. येथील वाळू खुल्या बाजारात बोगस चालान वापरून आणली जात असल्याचे पोलिसांनी गौण खनिज विभागाला, १६ मे रोजी पत्राने कळविले होते. गौण खनिज विभागाने देखील चालान अवैध असल्याचे उत्तर पोलिसांना दिले, परंतु सनव येथील स्थळपाहणी केली नाही. बेकायदेशीर उपशातून सुमारे १० कोटींचा महसूल बुडाल्याची शक्यता आहे.

ईटीएस मोजणी व्हावी...भूमी अभिलेख आणि खासगी मोजणीद्वारे ईटीएस मोजणी करून मंजुरी किती आणि उपसा किती झाला आहे, हे तपासणे गरजेचे आहे. भूमी अभिलेख विभागाची मोजणी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली, तर पारदर्शक होईल, अन्यथा तेथेही लपवाछपवी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, वाळूपट्ट्यात ३ डोजर सपाटीकरण करण्यासाठी उभे आहेत. मोजणीअंती सत्यता समोर येईल.

पोलिसांनी कळवूनही यंत्रणा शांत...१६ मे रोजी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी हायवा क्र. एमएच १७ बीवाय ८५५३ पकडला. सनव येथील ठेक्यातील ही वाळू शहरात येत होती. याबाबत गौण खनिज विभागाकडे पोलिसांनी विचारणा केली असता, गौण खनिज अधिकारी किशोर घोडके यांनी २० मे रोजी पोलिसांना पत्र दिले. त्यात ते म्हणाले, हायवा क्र. एमएच १७ बीवाय ८५५३ चा ईटीपी क्र. २४०४११४३ ची पावती मुदत १२ मेच्या दुपारी ३ पर्यंत होती. परंतु, त्या क्रमांकाची पावती १६ मेपर्यंत दिसत आहे. त्यानुसार ती वाळू वाहतूक अवैध आहे. पोलिसांनी कारवाई करून अहवाल द्यावा. दरम्यान शहरात जलजीवन मिशनच्या कामाची वाळू आलीच कशी, हा प्रश्न आहे.

मॅजिक पेन वापरून चालान ?मॅजिक पेन वापरून बोगस चालान तयार केले. त्यावरून शासकीय योजनांसाठी राखीव असलेल्या वाळूपट्ट्यातील वाळू शहरात आणली गेली. पोलिसांनी हायवा जप्त केला. हा सगळा प्रकार दाबून ठेवण्यात आला. १२ मे रोजी तयार केलेले चालान १६ मे रोजी वापरले जाते, तरी याकडे महसूल प्रशासन गांभीर्याने पाहत नाही. २ एप्रिल ते ३० जून २०२५ पर्यंत एमजीपी युजअंतर्गत असलेला वाळूपट्टा खुल्या बाजारात विक्रीसाठीही वापरल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरsandवाळू