शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

उन्हात कष्ट सारखेच, मात्र महिलांना रोजंदारी निम्मीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 17:35 IST

चैत्राच्या उन्हाने शहर दुपारी मरगळल्यासारखे शांत होते; परंतु रोजंदारीवर काबाडकष्ट करणाऱ्या महिला व पुरुषांना मात्र उन्हामुळे थांबण्याची किंवा विश्रांतीची सोय नाही.

ठळक मुद्देरोजंदारीवर काबाडकष्ट करणाऱ्या महिला व पुरुषांना मात्र उन्हामुळे थांबण्याची किंवा विश्रांतीची सोय नाही.मजूर महिला जिद्दीने पुरुष सहकाऱ्याच्या तोडीसतोड काम करतात मात्र त्यांच्या तुलनेत तिला मजुरी मात्र निम्मीच मिळते,

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : एप्रिल महिन्याची रखरखीत दुपार, डोक्यावर आग ओकणारा सूर्यनारायण आणि अंगाची होणारी लाहीलाही, अशा अवस्थेत जेथे घरात किंवा कार्यालयात बसून काम करणेही असह्य होते, अशा परिस्थितीत डोक्यावर मातीचे टोपले उचलून आणि प्रसंगी ड्रेनेजच्या खड्ड्यात उतरून एक मजूर महिला जिद्दीने काम करते. तिचे काम पुरुष सहकाऱ्याच्या तोडीसतोड असूनही त्यांच्या तुलनेत तिला मजुरी मात्र निम्मीच मिळते, या विदारक असमानतेची खंत परसबाई काळवाणी ही कष्टकरी महिला व्यक्त करते.चैत्राच्या उन्हाने शहर दुपारी मरगळल्यासारखे शांत होते; परंतु रोजंदारीवर काबाडकष्ट करणाऱ्या महिला व पुरुषांना मात्र उन्हामुळे थांबण्याची किंवा विश्रांतीची सोय नाही. शहरात काही ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. अशाच एका बांधकाम साईडवर परसबाई काळवाणी या कष्टकरी महिला भर उन्हात राबताना दिसून आल्या. वाढत्या उष्णतेमुळे जेथे खिडकीबाहेर डोकावून पाहणेही अवघड वाटते, अशा स्थितीत काळवाणी यांच्यासारख्या हजारो मजूर महिला मोठ्या कष्टाचे काम करत एकेक दिवस पुढे ढकलतात. त्यांच्यासोबत जे पुरुष सहकारी असतात, त्यांच्या तुलनेत या महिलांचे काम कुठेही कमी नाही किंबहुना काकणभर सरसच असेल. कष्ट सारखेच, कामाचे स्वरूपही सारखेच, पण तरीही ‘बाप्याच्या कामाची सर बाईच्या कामाला कशी येणार?’ असा सवाल करत ठेकेदार या महिलांच्या हातावर पुरुष मजुरांच्या तुलनेत अर्धीच रक्कम टेकवतो आणि त्यांची बोळवण करतो, अशी परिस्थिती सध्या बांधकाम क्षेत्रासारख्या असंघटित क्षेत्रात दिसून येत आहे. जेथे पुरुषांना दिवसाची मजुरी ४०० रुपये देण्यात येते, तेथे तेच काम करणाऱ्या महिलांना केवळ २०० रुपये मिळतात.

आपली परिस्थिती अन्यायकारक आहे, पण दाद मागायची कशी आणि कोणाकडे, असा या महिलांचा प्रश्न आहे. या गोष्टीला विरोध केला तर ठेकेदार कामावरून कमी करील, त्यापेक्षा मिळतील तेवढे पैसे घ्या आणि निमूटपणे काम करा, अशी या महिलांची हतबलता आहे. स्त्री-पुरुष समानतेचे वारे सर्वत्र वाहत असताना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या या महिलांकडे मात्र सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. 

पोटात आग उठल्यावर...उन्हापासून बचाव करण्यासाठी गॉगल, स्कार्फ, हॅण्डग्लोज, सनकोट अशी जय्यत तयारी करून महिला घराबाहेर पडतात. तेथे परसबार्इंसारख्या महिला मात्र उन्हाचे चटके सोसतच प्रत्येक क्षण पुढे ढकलतात. पोटात आग उठली असताना डोक्यावरच्या आगीची चिंता कोण करणार? अशी एकाच वाक्यात जीवनकथा सांगत परसबार्इंनी पुन्हा कामाला सुरुवात केली.

टॅग्स :WomenमहिलाAurangabadऔरंगाबादMONEYपैसाEmployeeकर्मचारी