शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्रीचा थरार! सिग्नल झाकले, साखळी ओढली; औरंगाबादजवळ देवगिरी एक्सप्रेसवर दरोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 09:40 IST

आठ ते दहा दरोडेखोर रेल्वेत चढले आणि त्यांनी प्रवाशांची लूटमार सुरू केली. जवळपास अर्धा तास हा प्रकार सुरू होता.

औरंगाबाद: औरंगाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसवर दरोडा पडल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री १२ वाजेच्या दरम्यान दौलताबाद- पोटूळ मार्गादरम्यान घडली. सिग्नलला कपडा बांधून रेल्वे थांबवून आठ ते दहा जणांच्या टोळीने लूटमार केल्याचे रेल्वे सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितले. 

यापूर्वी याच मार्गावर १ एप्रिल २०२२ रोजी अशाच प्रकारे नंदीग्राम एक्सप्रेस आणि नांदेड-मनमाड पॅसेंजर रेल्वे थांबवून लूटमार केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर सुरक्षा वाढविण्यात आली होती. परंतु, गुरुवारी मध्यरात्री पुन्हा अशीच घटना घडल्याने रेल्वेच्या रात्रीच्या प्रवासाबरोबर सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

औरंगाबाद स्टेशनवरून देवगिरी एक्सप्रेस मुंबईकडे रवाना होताच गुरुवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास पोटूळ रेल्वेस्टेशन जवळ सिग्नलला कपडा बांधून रेल्वे थांबविण्यात आली. या दरम्यान आठ ते दहा दरोडेखोर रेल्वेत चढले आणि त्यांनी प्रवाशांची लूटमार सुरू केली. जवळपास अर्धा तास हा प्रकार सुरू होता. रेल्वे चालकांनी सतर्कता दाखवून रेल्वे पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र दरोडेखोर साखळी ओढून रेल्वे थांबवित होते.

या घटनेची माहिती रेल्वे सुरक्षा बळाला मिळताच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेट किती प्रवासांची लूटमार झाली, किती ऐवज गेला हे उशीरापर्यंत समजू शकले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी एक रुग्णवाहिका होती. दरोडेखोरांनी याच रुग्णवाहिकेचा वापर केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तुफान दगडफेकS 5 ते 9 या डब्यावर तूफान दगडफेक झाली आहे, असे प्रत्यक्षदर्शी प्रवास्यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात आरडाओरडा झाल्याने प्रवास्यांनी दरवाजा व खिडक्या बंद करून घेतल्या, अशी माहिती रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी दिली

टॅग्स :RobberyचोरीAurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे