शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कष्ट तेवढेच पण मजुरीत भेदभाव; पुरुष कामगारांना ७००, तर महिलांना फक्त ३०० रुपये रोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 19:00 IST

कुठल्याही सरकारी योजनांचा लाभ मिळत नसल्याचे या महिला कामगारांनी सांगितले.

- प्राची पाटील

छत्रपती संभाजीनगर : कामगारांच्या गर्दीने गजबजलेला कामगार चौक. सर्वत्र वाहनांची आणि माणसांची वर्दळ. त्यातच एका बाजूला घोळका करून बसलेल्या महिला कामगार. तुमचा रोज काय, असा प्रश्न जेव्हा ‘लोकमत प्रतिनिधी’ने त्यांना विचारला तेव्हा त्या म्हणाल्या, ‘४० रुपये रोजापासून सुरुवात करत आता कुठे ४०० वर येऊन पोहोचलोय.’ पुरुषांपेक्षा कमी रोज का? यावर डोळ्याला पदर लावत त्या म्हणाल्या, पुरुष ठेकेदार म्हणतात की, ‘बायका माणसाएवढं काम करतात का?’

समान वेतन हक्क कायदा देशात लागू आहे. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी दिसत नाही. कामगार दिनानिमित्त ‘लोकमत’ने शहरातील कामगार चौक आणि लेबर नाक्यावर जाऊन पाहणी केली. त्यावेळी महिला कामगारांना पुरुषांपेक्षा कमी वेतन असल्याचे दिसून आले. जिथे पुरुष कामगारांना ७०० ते १००० रुपये रोज आहे, तिथे महिला कामगारांना ३०० ते ५०० रुपये रोज मिळतो. कामगार चौकातल्या महिला कामगार या बिगारी काम करतात. कामगार चौकातील पुरुष कामगार सिद्धार्थ चरेकर म्हणाले, महिला पुरुष कामगारांपेक्षा कोणतेही काम व्यवस्थित करतात. तरीही त्यांना वेतन कमी का, याचे उत्तर आमच्याकडे नाही.

कधी काम भेटते तर कधी नाही१५ वर्षे कामगार म्हणून मी काम करत आहे. बायामाणसांना कुठे एवढी हजेरी असते का, असा प्रश्न ठेकेदार विचारतात. आम्ही रोज नाक्यावर येऊन बसतो. कधी काम मिळते तर कधी नाही.- गयाबाई प्रधान, मजूर

कालही तीच अवस्था६० रुपये हजेरी होती तेव्हापासून मी बिगारी काम करते. आता ३०० ते ५०० रुपयांपर्यंत हजेरी मिळते. आमच्या अडचणींकडे कोणीही लक्ष देत नाही.- जुलेखाँ पठाण, मजूर

जड काम अवघडमहिला कामगारांना पूर्वी फारच कमी वेतन होते. आता थोडे वाढले आहे. ठेकेदार म्हणतात, महिला जड गोण्या उचलू शकत नाहीत. विटांचे टोपलेच्या टोपले नेणे त्यांना जमत नाही.- काशीनाथ उघडे, कोषाध्यक्ष, कामगार संघटना

सरकारी योजना कागदावरचकुठल्याही सरकारी योजनांचा लाभ या महिला कामगारांना मिळत नसल्याचे महिलांनी सांगितले. उषा थाठे, मीना शेजूळ, शारदा वैद्ये, ज्योती कसबे या महिला कामगार म्हणाल्या, कामगारांसाठीच्या कुठल्याही सरकारी योजनांचा लाभ आम्हाला मिळालेला नाही. सरकारी कर्मचारी एकदा भेटतात. नंतर तोंडही दाखवत नाहीत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरLabourकामगार