शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'संभाजीनगर', नामांतराच्या कॅबिनेट निर्णयानंतर शिवसैनिकांचा शहरात जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 20:19 IST

अनेक नागरिक, शिवसैनिक छत्रपती संभाजी चौकात जमा होऊन ढोलताशाच्या गजरात आनंद साजरा करत आहेत.

औरंगाबाद: आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबाद शहराचे संभाजीनगर करण्याच्या मागणीची पूर्तता करण्यात आली. कॅबिनेट मंजुरी मिळताच शहरात शिवसैनिकांनी जल्लोष सुरु केला आहे. शहरातील टीव्ही सेंटर भागातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शिवसैनिक नागरिकांसह ढोलताशाच्या गजरात आनंद व्यक्त करत आहेत. 

शिवसेना मंत्र्यांनी आज औरंगाबाद शहराचे संभाजीनगर करण्याचा हा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मांडला. त्यानंतर या प्रस्तावाला कॅबिनेटने मंजुरी दिली. राज्यशासन स्तरावर हा निर्णय झाल्याने संभाजीनगर नावास आग्रही असणाऱ्या शिवसैनिकांनी जल्लोष सुरु केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर नामकरण करून हिदुत्वबाणा दाखवून दिला असल्याची प्रतिक्रिया जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी दिली. तसेच अनेक नागरिक, शिवसैनिक छत्रपती संभाजी चौकात जमा होऊन ढोलताशाच्या गजरात आनंद साजरा करत आहेत. दरम्यान, खासदार इम्तियाज जलील यांनी नामकारणाचा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. केंद्र शासनाने या निर्णयास मजुरी देऊ नये. प्रसंगी याच्या विरोधात रस्त्यावर उतरू असा इशारा देखील खा. जलील यांनी दिला. 

 

आजच्या बैठकीत घेतलेले महत्वाचे निर्णय

  • औरंगाबाद शहराच्या "संभाजीनगर" नामकरणास मान्यता. (सामान्य प्रशासन विभाग)
  • उस्मानाबाद शहराच्या “धाराशिव" नामकरणास मान्यता. (सामान्य प्रशासन विभाग)
  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता. (नगर विकास विभाग)
  • राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार. (कृषि विभाग)
  • कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार (विधि व न्याय विभाग)
  • अहमदनगर - बीड - परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार(परिवहन विभाग)
  • ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार. (इतर मागास बहुजन कल्याण विभाग)
  • विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय. (नियोजन विभाग)
  • निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय ( सामान्य प्रशासन विभाग)
  • शासन अधिसुचना ८ मार्च २०१९ अनुसार आकारावयाच्या अधिमुल्याची रक्कम भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णय.  (महसूल विभाग)
टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे