औरंगाबाद : परप्रांतीय अभियंत्याला जिवे मारण्याची धमकी देत एटीएम कार्ड हिसकावल्यानंतर आणि पीन कार्ड विचारून घेत एटीएममधून १६ हजार ५०० रुपये काढून नेणाऱ्या तीन जणांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली. आरोपींपैकी एका जण मोठ्या कंपनीत सेल्स मॅनेजर, तर अन्य दोघे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी असल्याचे समोर आले.सेल्स मॅनेजर संकेत रावसाहेब करपे (२४, रा. आयोध्यानगर, सिडको एन-७), अभियांत्रिकीचा विद्यार्थी अमित सुनील बुटवले (वय २१, रा. विशालनगर) आणि नहुश पाडळकर (वय २१, रा. सिडको एन-५) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की, जी. एस. राहुल (रा. एन-१ सिडको, मूळ रा. छत्तीसगढ) हा चिकलठाणा डीएमआयसीमधील एका खाजगी कंपनीत दोन महिन्यांपासून अभियंता म्हणून कार्यरत आहे. ७ आॅक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जेवण करून फिरण्यासाठी मोटारसायकलने घराबाहेर पडला. त्यानंतर तो त्याच्या कंपनीच्या बाजूला असलेल्या पायºयासमोर येऊन बसला. तो मोबाईलवर बोलत असताना एक अनोळखी तरुण त्याच्याजवळ आला आणि तू येथे कशासाठी आला असे म्हणाला. त्याचवेळी त्याचे आणखी दोन साथीदार तेथे आले. तू येथे कशाला आला, हा आमचा इलाखा आहे, असे धमकावत शिवीगाळ करून मारहाण करू लागले. त्यांनी पकडून राहुलच्या खिशातील एटीएम कार्ड आणि पाकिट बळजबरीने काढून घेतले. त्यानंतर जिवे मारण्याची धमकी देत पिन नंबर विचारून घेतला. त्याने सांगितलेला एटीएम नंबर चुकीचा असू शकतो, म्हणून आरोपीपैकी एक जण एटीएममधून पैसे काढण्यासाठी राहुलची मोटारसायकल घेऊन एटीएमवर गेला आणि त्याने त्याच्या एटीएम कार्डचा वापर करून १० हजार आणि ६ हजार ५०० रुपये असे एकूण १६ हजार ५०० रुपये बळजबरीने परस्पर काढून घेतले. यावेळी अन्य दोन आरोपींनी राहुलला पकडून ठेवले होते. त्याच्या एटीएमचा वापर करून १६ हजार ५०० रुपये काढल्याचे दोन मेसेज राहुलच्या मोबाईलवर आले. त्यानंतर तो तरुण परत आला. यावेळी त्यांनी पुन्हा राहुलला जिवे मारण्याची धमकी देत ते त्याची मोटारसायकल बळजबरीने घेऊन गेले. या घटनेनंतर सुमारे साडेअकरा वाजेच्या सुमारास राहुलने एमआयडीसी सिडको ठाण्यात धाव घेतली. तेव्हापासून पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, गुन्हे शाखेचे अधिकारी-कर्मचारी आरोपीचा शोध घेत होते. मात्र, सोमवारी सायंकाळी ते पोलिसांच्या हाती लागले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे निरीक्षक माळाळे म्हणाले.
मारहाण करून अभियंत्याला लुटणारे निघाले नामांकित कंपनीत सेल्स मॅनेजर, अभियांत्रिकीचे विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 23:58 IST
परप्रांतीय अभियंत्याला जिवे मारण्याची धमकी देत एटीएम कार्ड हिसकावल्यानंतर आणि पीन कार्ड विचारून घेत एटीएममधून १६ हजार ५०० रुपये काढून नेणाऱ्या तीन जणांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली. आरोपींपैकी एका जण मोठ्या कंपनीत सेल्स मॅनेजर, तर अन्य दोघे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी असल्याचे समोर आले.
मारहाण करून अभियंत्याला लुटणारे निघाले नामांकित कंपनीत सेल्स मॅनेजर, अभियांत्रिकीचे विद्यार्थी
ठळक मुद्देसिडको एन-१ येथे रात्रीची घटना : २४ तासांत आरोपींना केली अटक