शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सख्खा भाऊ वैरी ! पैशाच्या वादातून लहान भावाची चाकूने भोसकून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 16:58 IST

खून करून पळालेल्या मोठ्या भावास पोलिसांनी पैठण येथून ताब्यात घेतले

औरंगाबाद : पैशाच्या वादातून मोठ्या भावाने वकिल असलेल्या लहान भावाची चाकूने सपासप वार करून आणि भोसकून निर्घृण हत्या केली . ही खळबळजनक  घटना गारखेडा रिलायन्स मॉल समोरील अशोकनगरातील परितोष विहार या अपार्टमेंटमध्ये शुक्रवारी (दि २४ ) सकाळी ९ :२० वाजेच्या सुमारास घडली. 

सूर्यप्रकाश रामनाथ ठाकूर (वय ५४ ) असे खून झालेल्या वकिलाचे नाव आहे. या घटनेनंतर पळून गेलेला खूनी भाऊ वेदप्रकाश रामनाथ ठाकूर (५७ रा. पैठण ) याला जवाहरनगर पोलिसांनी पैठण येथे ताब्यात घेतले. प्राप्त माहिती अशी की, मयत सूर्यप्रकाश ठाकूर हे रिलायन्स मॉलसमोरील परितोष अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर फ्लॅटमध्ये पत्नी आशा यांच्यासह राहात होते. सूर्यप्रकाश हे चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील पॅरासन कंपनीत विधी सल्लागार म्हणून १३ वर्षापासून कार्यरत होते. तर त्यांची पत्नी खाजगी रुग्णालयात नर्स आहे. 

आज सकाळी ते सूर्यप्रकाश हे बॅग घेऊन कामावर जाण्याच्या तयारीत असताना त्यांचा मोठा भाऊ आरोपी वेदप्रकाश त्यांच्या घरी आला. यावेळी त्याने घर बांधकाम करण्यासाठी सूर्यप्रकाश यांच्याकडे २ लाख रुपयांची मागणी केली. दोन भावामध्ये पैशावरुन बोलणी सुरू असताना आशा चहासाठी दूध आणण्यासाठी वरच्या मजल्यावरील संहिता जोशी यांच्या घरी गेल्या. त्याचवेळी आरोपीने सूर्यप्रकाश यांच्या छाती, पोट, मान, हात, दंडावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यानंतर त्यांना रक्ताच्या थारोळ्यात सोडून आरोपी शस्त्रासह घटनास्थळावरुन दुचाकीने पसार झाला. या घटनेची माहिती जवाहरनगर पोलिसांना कळविण्यात आली. पोलीस निरीक्षक संतोष पाटिल, पोलीस उपनिरिक्षक भरत पाचोळे, कर्मचारी समाधान काळे, दंडवते यांनी घटनास्थळी धाव घेतली .

अवघ्या ४ ते ५ मिनिटात हत्या आशा वरच्या मजल्यावर जाऊन  ४ ते ५ मिनिटे होत असताना धूणी भांडी करणाऱ्या विमलबाई यांना पहिल्या मजल्यावरून  रक्ताने माखलेल्या हातासह एक व्यक्ती घाईघाईने जिना उतरून जात असल्याचे दिसले. त्यानंतर विमलबाई यांनी सूर्यप्रकाश यांचे दाराची बाहेरुन लावलेली कडी उघडताच त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले सूर्यप्रकाश दिसले. यावेळी तिने आरडाओरड करीत वरच्या मजल्यावर गेलेल्या आशा यांना बोलावले. यानंतर शेजाऱ्यांनी सूर्यप्रकाश यांना रिक्षातून एम जी एम रुग्णालयात  नेले . मात्र तोपर्यंत उशीर झाला होता . तेथील डॉक्टरांनी सूर्यप्रकाश यांना तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस