शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

वारकऱ्यांच्या सेवेचा साईप्रसादचा संकल्प

By admin | Updated: April 18, 2016 00:40 IST

नांदेड : साईप्रसाद संस्थेने आगामी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे वारीतील तब्बल चार लाख भाविकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा संकल्प केला आहे़

नांदेड : पदाधिकारी नसलेली, प्रसिद्धीपासून दूर आणि समाजकार्यात अग्रेसर असलेल्या साईप्रसाद संस्थेने आगामी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे वारीतील तब्बल चार लाख भाविकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा संकल्प केला आहे़ सर्वेक्षणानुसार वारीमध्ये दूषित पाण्यामुळे दरवर्षी हजारो वारकरी आजारी पडतात़ त्यामुळे वारकऱ्यांना मिनरल वॉटरचे पाणी देण्यासाठी साईप्रसादने तयारी सुरु केली असून त्याचा अंदाजित खर्च जवळपास ५० लाख रुपये आहे़साईप्रसादच्या वतीने गतवर्षी आत्महत्याग्रस्त व गरीब शेतकरी कुटुंबातील ५१ मुलींचे लग्न लावण्यात आले होते़ यंदाही फेब्रुवारीमध्ये अशाच ६३ जोडप्यांचे शुभमंगलही साईप्रसादच्या मदतीने पार पडले़ या संस्थेत वर्ग-१, २ चे निवृत्त अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक, डॉक्टर, व्यापारी यासह शेकडो सामान्य नागरिकांचा समावेश आहे़ यापूर्वी २०१५ मध्ये पालखी सोहळ्यात श्री बाबा महाराज सातारकर यांच्या दिंडी सोहळ्यातील जवळपास अडीच हजार वारकऱ्यांसाठी साईप्रसादच्या वतीने शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती़ त्यामुळे पूर्ण वारीकाळात या दिंडीतील एकही वारकरी आजारी पडला नाही़ पुढील यात्रा ही जूनमध्ये आहे़ या वारकऱ्यांना मिळेल त्या ठिकाणचे पाणी पिऊन आपली तहान भागवावी लागते़ त्यामुळे वारीमध्ये अनेक जण आजारी पडतात़ त्यामुळे वारीतील ४ लाख भाविकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी साईप्रसादने आतापासूनच तयारी सुरु केली आहे़ नांदेडात साईप्रसादचे एक हजार सदस्य असून त्यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे़ त्यासाठी पाच हजार लिटर प्रतितास पाणी फिल्टर करणारा प्लांट, २ हजार लिटर पाणी साठविण्यासाठी टाक्या, २०० स्वयंसेवक, १२ ट्रक, १ ट्रेलर, १० हजार लिटरचे पाण्याचे पाच टँकर, जनित्र, दहा तंबू, पाण्याच्या २० मोटारी, स्टीलचे २ हजार ग्लास आदी अनेक साहित्याची गरज आहे़ त्या सर्वांवर मिळून जवळपास ५० लाखांचा खर्च होणार आहे़ पंढरपूरमध्ये दर्शनाच्या रांगेत उभी असलेली जवळपास ८ ते १० वारकरी मंडळी ४० तास रांगेत असतात़ त्यांच्याकरिताही शेवटच्या दोन दिवसांत शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे़ वारीनंतर पुढील अकरा महिने हा वॉटर प्लांट शासकीय रुग्णालयात बसविण्यात येणार आहे़ जेणेकरुन रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची सोय होईल़ नांदेडात विविध समाजपयोगी उपक्रम राबवून आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या साईप्रसादने वारकऱ्यांच्या सेवेसाठी उचललेल्या या पावलाला नांदेडकरांनीही हातभार लावावा, असे आवाहन साईप्रसादच्या वतीने करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)