औरंगाबाद : लोकमत सखी मंचतर्फे महिलांच्या कलागुणांना प्रसिद्धी देण्यासाठी सखी महोत्सव व सखी सम्राज्ञी या स्पर्धेचे आयोजन १७ मे रोजी होत आहे. लोकमत हॉल, लोकमत भवन, जालना रोड, औरंगाबाद येथे हा सखी महोत्सव होईल. सखी सम्राज्ञी स्पर्धेची अंतिम फेरी सखी सम्राज्ञी या स्पर्धेची अंतिम फेरी १७ मे, शनिवारी सायंकाळी ६ वाजता होईल. त्याचबरोबर सारेगमप फेम मंगेश बोरगावकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम लोकमत लॉनवर होईल. या कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त सखींना घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश मागील गेटने मिळेल. (लोकमत ब्युरो)
सारेगम फेम मंगेश बोरगावकर यांचे गायन
By admin | Updated: May 17, 2014 01:14 IST