शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

केसर आंबा फेब्रुवारीतच येणार? यंदा प्रथमच ऑक्टोबरमध्ये लागला मोहर

By बापू सोळुंके | Updated: October 20, 2023 20:00 IST

बदललेल्या हवामानामुळे केसर आंब्याच्या झाडांना यंदा प्रथमच ऑक्टोबरमध्ये मोहर लागल्याचे दिसून येत आहे.

छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी मराठवाडा, विदर्भासह उर्वरित महाराष्ट्रात आंब्याच्या झाडांना डिसेंबर ते जानेवारी महिन्यात मोहर येत असतो. यंदा मात्र हवामान बदलाच्या परिणामामुळे मराठवाड्यातील केसर आंब्याला ऑक्टोबरमध्येच मोहर आल्याचे दिसून येत आहे. यामुळे कोकणातील हापूससोबत केसरही फेब्रुवारी महिन्यात बाजारात येण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील केसर आंबा आता जगभरात प्रसिद्ध झाला आहे. जगभरातून केसरला मागणी असते. दरवर्षी केसरला डिसेंबर ते जानेवारीदरम्यान मोहर येतो आणि एप्रिलच्या पहिल्या सप्ताहानंतर केसर बाजारात दाखल होतो. तेव्हा बाजारात केसरला चांगला दरही मिळतो. मात्र, तत्पूर्वीच फेब्रुवारी महिन्यात काेकणचा राजा म्हणून ओळखला जाणारा हापूस बाजारात दाखल होत असतो. हापूसला चांगली मागणी असल्याने भावही सर्वाधिक मिळतो. यावर्षी मात्र प्रथमच केसर आंब्याच्या झाडांना ऑक्टोबर महिन्यात मोहर लागला आहे. कोकणातील हापूस आंब्यालाही याचवेळी मोहर लागत असतो. यामुळे यंदा प्रथमच फेब्रुवारी २०२४ मध्ये हापूससोबतच केसर बाजारात दाखल होऊ शकतो.

याविषयी आंबा संशोधक भगवानराव कापसे म्हणाले की, यावर्षी मराठवाड्यात अत्यल्प पाऊस झाला. बदललेल्या हवामानामुळे केसर आंब्याच्या झाडांना यंदा प्रथमच ऑक्टोबरमध्ये मोहर लागल्याचे दिसून येत आहे. वास्तविक आपल्याकडे डिसेंबर, जानेवारीमध्ये आंब्याच्या झाडांना मोहर लागत असतो. आणि उत्पादनाला सुरुवातही एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यानंतर होत असते. यावर्षी पंढरपूरजवळील सागर गावधरे, धाराशिव जिल्ह्यातील पार्डीचे विठ्ठल चौधरी आणि नाशिक जिल्ह्यातील रान वडगाव येथील संदीप जाधव यांच्या केसर बागेतील १५ ते २० टक्के झाडांना मोहर लागला आहे. परिणामी, दीड महिना आधी मोहर लागल्याने उत्पादनही दीड महिना आधी म्हणजे फेब्रुवारी महिन्यात सुरू होईल आणि केसरला चांगला भाव मिळेल.

हापूससारखाच चांगला भाव मिळेलवास्तविक या दिवसांत फक्त हापूस आंब्याला कोकणात काही प्रमाणात मोहर येतो. तसेच बारामासी या वाणास तर वर्षभर मोहर येतो, मात्र हा वाण व्यापारीदृष्ट्या तेवढा महत्त्वाचा नाही. केसरला आता आलेल्या मोहरास फेब्रुवारीमध्ये फळे काढणीस येऊ शकतात, ज्याला हापूससारखाच चांगला भाव मिळू शकतो.- डॉ. भगवानराव कापसे, उपाध्यक्ष, केसर आंबा बागायतदार संघ.

टॅग्स :MangoआंबाAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी