शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त प्रसूती रजेमुळे महिला वाहकांना मिळते सुरक्षित मातृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 15:15 IST

गरोदरपणात बसमधील कर्तव्यामुळे महिला वाहकांना गर्भपाताला सामोरे जाण्याची दुर्दैवी वेळ ओढावत होती.

ठळक मुद्देऔरंगाबाद विभागात ११ महिला वाहकांना आधार‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर वर्षभरापासून होतेय अंमलबजावणी

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : एस. टी. महामंडळातील महिला वाहकांना गरोदरपणात सामोरे जावे लागणाऱ्या वेदनांना ‘लोकमत’ने वाचा फोडल्यानंतर गेल्या वर्षभरापासून १८० दिवसांच्या प्रसूती रजेबरोबर त्यांना तीन महिने अतिरिक्त रजा देण्याची अंमलबजावणी होत आहे. यामुळे महिला वाहकांना सुरक्षित मातृत्व प्राप्त होत असून, औरंगाबाद विभागात आतापर्यंत ११ जणांना अतिरिक्त प्रसूती रजेचा आधार मिळाला आहे.

एस. टी. महामंडळातील राज्यभरात काही महिला वाहकांचे अचानक गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ने १४ जुलै २०१७ रोजी समोर आणली. या वृत्ताने एस. टी. महामंडळातील महिला वाहकांना सामोरे जाव्या लागणाऱ्या गंभीर प्रश्नाला वाचा फुटली आणि याविषयी सर्व स्तरातून तीव्र पडसाद उमटले. या घटनेचा निषेध व्यक्त करीत महिला वाहकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात आली. याचा ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा केला. अखेर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आॅगस्ट २०१७ मध्ये महिला कर्मचाऱ्यांना हक्काच्या प्रसूती रजेबरोबरच बाळाच्या संगोपनासाठी तीन महिने अतिरिक्त रजा देण्याची घोषणा केली. मात्र, पाच महिने उलटूनही प्रशासनाकडून परिपत्रक  निघाले नसल्यामुळे अतिरिक्त रजेची अंमलबजावणीच झाली नाही. फक्त घोषणाच झाल्याने महिला कर्मचाऱ्यांतून संताप व्यक्त झाला. याविषयीदेखील १ फेब्रुवारी २०१८ रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर वर्षभरापूर्वी २३ मार्च २०१८ रोजी अंमलबजावणीचे परिपत्रक निघाले आणि हजारो महिला वाहकांना दिलासा मिळाला.

औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत एका महिला वाहकाला अतिरिक्त रजेचा लाभ मिळाला आहे. तर सध्या १० महिला वाहक रजेवर आहेत, अशी माहिती एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. गरोदरपणात बसमधील कर्तव्यामुळे महिला वाहकांना गर्भपाताला सामोरे जाण्याची दुर्दैवी वेळ ओढावत होती. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासह गरोदर महिला वाहकांना महामंडळाने टेबल वर्क मिळाले पाहिजे, अशीही मागणी करण्यात आली होती. त्याचीदेखील अंमलबजावणी होत असल्याने महिला वाहकांना दिलासा मिळत आहे. 

लढा यशस्वीमहिला वाहकांच्या सुरक्षित मातृत्वासाठी उभारलेला लढा यशस्वी झाला. अनेक महिला वाहकांना त्याचा लाभ मिळत आहे. तीन महिने अतिरिक्त रजा मिळाल्याने शिशूंकडे अधिक चांगल्या पद्धतीने लक्ष देता येते. यासाठी ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा केला. त्यामुळे महिला वाहकांना सुरक्षित मातृत्वाचा हक्क मिळाला. - शीला नाईकवाडे, केंद्रीय उपाध्यक्षा, महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना

टॅग्स :state transportएसटीpregnant womanगर्भवती महिलाHealthआरोग्यAurangabadऔरंगाबादLokmatलोकमत