शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘एलएचबी’ डब्यांसह सचखंड एक्स्प्रेस स्थानकात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 16:15 IST

पारंपरिक डब्यांच्या तुलनेत एलएचबी डब्यांमध्ये स्लीपर क्लासमध्ये ८, ए.सी. थ्री टायरमध्ये ८ आणि एसी टू टायर मध्ये ४ बर्थ अधिक असतात.

औरंगाबाद : नांदेड येथून अमृतसरला जाणारी सचखंड एक्स्प्रेस (१२७१५) ‘एलएचबी’ अर्थात लिंके हॉफमन बोस्च या जर्मन कंपनीने विकसित केलेले २२ डबे घेऊन औरंगाबाद स्थानकात गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास दाखल झाली. या एक्स्प्रेसचे लोहमार्ग पोलीस, प्रवासी सेनेसह रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्वागत केले. 

पारंपरिक डब्यांच्या तुलनेत एलएचबी डब्यांमध्ये स्लीपर क्लासमध्ये ८, ए.सी. थ्री टायरमध्ये ८ आणि एसी टू टायर मध्ये ४ बर्थ अधिक असतात. साधारण डब्यापेक्षा एलएचबी पद्धतीचे डबे अधिक आरामदायी आणि सुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघात झाल्यास या पद्धतीचे डबे एकमेकांवर चढत नाहीत. त्यामुळे किमान हानी होते. चाकांना डिस्क ब्रेक असल्यामुळे अधिक सुरक्षितता येते. तसेच प्रसाधनगृह आधुनिक आणि पर्यावरणपूरक असून, या डब्यांची निर्मिती भारतीय रेल्वेमध्ये करण्यात आली आहे.

आधुनिक पद्धतीने तयार केलेले एलएचबी डबे घेऊन गुरुवारी सचखंड एक्स्प्रेस औरंगाबाद स्थानकात दाखल झाली. यावेळी स्थानक व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे, लोहमार्ग पोलीस निरीक्षक दिलीप साबळे, रेल्वे पोलीस निरीक्षक अरविंदकुमार शर्मा, प्रवासी रेल्वे सेनेचे संतोष सोमाणी यांच्यासह प्रवासी उपस्थित होते. 

प्रवाशांची गैरसोय दूर होणार जर्मन तंत्रज्ञानाच्या आधारे हे डबे विकसित करण्यात आले आहेत. यामध्ये आसन क्षमता वाढल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होऊन रेल्वेचेही उत्पन्न वाढणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक बाबींचा यात सामवेश करण्यात आलेला आहे.     - लक्ष्मीकांत जाखडे, रेल्वेस्थानक व्यवस्थापक, औरंगाबाद

एलएचबी  बोगीचे वैशिष्ट्य- जास्त बर्थ : स्लीपर क्लासमध्ये- ८, ए.सी. थ्री टायरमध्ये-८ आणि ए.सी. टू टायरमध्ये ४ बर्थ जास्त.- एलएचबी कोचेस अधिक आरामदायक.- अधिक सुरक्षित बोगी. अपघाताच्या वेळी कोचेस एकमेकांवर चढत नाहीत. त्यामुळे  हानी कमी होते.- बोगींना डिस्क ब्रेक. त्यामुळे सुरक्षितता वाढते.- बोगींमध्ये प्रसाधनेदेखील आधुनिक स्वरुपाची.- प्रत्येक सीटसाठी मोबाईल चार्जर, हँगर, अग्निसुरक्षा कीट.- प्रवासी क्षमताही आता १३४ ने वाढली.

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीAurangabadऔरंगाबादAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशन