शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

खुलताबादमध्ये मध्यरात्री ईव्हीएम मशीन हलवल्याची अफवा; पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जुंपली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 18:36 IST

मतमोजणी पुढे ढकलल्याने तणाव वाढला, एका अफवेमुळे शेकडो कार्यकर्त्यांची धावपळ

- सुनील घोडकेखुलताबाद: न्यायालयाच्या आदेशामुळे नगरपरिषद निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली गेल्याने आधीच चिंतेत असलेल्या खुलताबादच्या राजकीय वातावरणात गुरुवारी रात्री मोठी खळबळ उडाली. नगरपरिषद कार्यालयातील स्ट्रॉंगरूममधून ईव्हीएम मशीन बॅगेत भरून हलवल्याची अफवा शहरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे उमेदवार आणि शेकडो कार्यकर्त्यांनी नगरपरिषद कार्यालय आणि पोलीस ठाण्याकडे मध्यरात्रीपर्यंत धाव घेतल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

रात्री १० वाजता नेमके काय घडले?खुलताबाद नगरपरिषद निवडणुकीत विक्रमी ८२.२६ टक्के मतदान झाले आहे आणि सर्व ईव्हीएम मशीन नगरपरिषद कार्यालयातील स्ट्रॉंगरूममध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) कडक बंदोबस्तात ठेवण्यात आले आहेत. गुरुवारी रात्री १० वाजता स्ट्रॉंगरूमच्या बंदोबस्तासाठी असलेले राखीव पोलीस दलाचे जवान अमरावती येथे जाण्यासाठी आपले सामान (बॅगा) पोलीस व्हॅनमध्ये टाकत होते. याच वेळी, एका अज्ञाताने फोनवरून 'ईव्हीएम मशीन मोठ्या बॅगेत भरून पोलीस घेऊन जात आहेत,' अशी अफवा पसरवली.

अफवा पसरल्याने रात्रीची धावपळही अफवा ऐकताच निवडणुकीत उतरलेले विविध पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे शेकडो समर्थक तात्काळ नगरपरिषद कार्यालयाजवळ जमा झाले. पोलीस व्हॅनमध्ये बॅगा टाकत असल्याचे पाहताच पदाधिकाऱ्यांनी थेट जवानांना अडवले आणि बॅगा तपासण्याची मागणी केली.

पोलीस आणि जवानांतच जुंपली!राखीव पोलीस दलाच्या जवानांनी सुरुवातीला बॅगेत कपडे आणि वैयक्तिक सामान असल्याचे सांगत बॅगा दाखवण्यास नकार दिला. यामुळे ईव्हीएम मशीन हलवल्याचा संशय कार्यकर्त्यांमध्ये अधिकच बळावला. संतप्त पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती खुलताबाद पोलिसांना दिली. सर्व जमाव नंतर पोलीस ठाण्यावर पोहोचला. पोलीस ठाण्यात खुलताबाद पोलिसांनी राखीव दलाच्या जवानांना बॅगा उघडून दाखवण्यास सांगितले. बॅगा उघडल्यावर त्यात ईव्हीएम नसून जवानांचे वैयक्तिक कपडे व साहित्य असल्याचे उघड झाले. परंतु, या वेळी राखीव पोलीस दलाचे जवान आणि खुलताबाद पोलीस यांच्यातच चांगलीच शाब्दिक चकमक झाली. हा सर्व घटनाक्रम मध्यरात्री १२:३० पर्यंत चालला होता. 

मतमोजणी पुढे ढकलल्याने चिंतान्यायालयाच्या आदेशामुळे मतमोजणीची तारीख ३ डिसेंबरवरून थेट २१ डिसेंबरवर गेली आहे. मतमोजणी पुढे ढकलल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिंदेसेनेचे उमेदवार 'काही गडबड घोटाळा होतो की काय' या चिंतेत आहेत. त्यामुळे हे सर्व उमेदवार आणि त्यांचे समर्थक दिवस-रात्र नगरपरिषद कार्यालयावर लक्ष ठेवून आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Khultabad: EVM rumor sparks midnight clash between police, activists.

Web Summary : Rumors of EVMs being moved in Khultabad caused tension as supporters gathered, leading to a confrontation between police and activists. The situation arose from postponed vote counting and unfounded suspicions.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरEVM Machineईव्हीएम मशीन