शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

भूमाफियांनी पसरवली खाम नदीपात्रात पाडापाडी होणार असल्याची अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 15:16 IST

गोरगरीब नागरिकांकडून स्वस्त दरात घरे विकत घेऊन नंतर चढ्या दराने विक्री करण्याचा हा डाव असू शकतो.

ठळक मुद्देमनपाची बोगस ऑर्डर सोशल मीडियावरनागरिकांनी घरे विकावीत म्हणून भूमाफियांचे कृत्य

औरंगाबाद : खाम नदीपात्रात दोन्ही बाजूने ३०० फुटांपर्यंत पाडापाडी करण्यात येणार असल्याची अफवा या भागातील काही भूमाफियांनी पसरविली आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या हजारो नागरिकांची झोप उडाली आहे. भूमाफियांनी महापालिकेच्या नावाने संगणकावर चक्क एक बोगस ऑर्डर तयार केली. ही ऑर्डर सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. खंडपीठाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येणार असल्याचे ऑर्डरमध्ये भूमाफियांनी नमूद केले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही ऑर्डर, त्यावरील सह्या बोगस असल्याचा निर्वाळा दिला आहे.

२०११-१२ मध्ये खाम नदीपात्रात महापालिकेने मोठी कारवाई केली होती. नदी पात्राचा मध्यबिंदू पकडून दोन्ही बाजूने १०० फुटांपर्यंतची सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त केली होती. या कारवाईत शेकडो नागरिकांना बेघर व्हावे लागले होते. नदीपात्राच्या दोन्ही बाजूने आज किमान दहा हजारांहून अधिक घरे असून ती पाडण्यात येणार आहेत, खंडपीठाने महापालिकेला आदेश दिले अशा तोंडी अफवा अगोदर पसरविण्यात आल्या. त्यानंतर भूमाफियांनी एक बोगस ऑर्डर तयार केली. अतिक्रमण हटाव विभागाने ही ऑर्डर जारी केल्याचे दाखविण्यात आले. नदीपात्रातील मध्यभाग दर्शविणारा नकाशा ऑर्डरवर काढण्यात आला आहे.  या ऑर्डरवरील जावक क्रमांकही चुकीचा आहे. सध्या ही ऑर्डर नदीपात्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या मोबाईलमध्ये आहे. महापालिका अतिक्रमण हटाव विभागातील सूत्रांनी सांगितले की, अशा पद्धतीची कोणतीच ऑर्डर आमच्याकडून तयार केली नाही.

नागरिकांनी घरे विकावीत म्हणूनखाम नदीच्या आसपास किमान ५०० पेक्षा अधिक जमिनीचा व्यवहार करणारे, दलाल आहेत. मागील काही दिवसांपासून या मंडळींना कामच उरलेले नाही. त्यामुळे त्यांनी ही खोटी अफवा पसरविली असावी, असे मनपा सूत्रांचे मत आहे. सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांकडून स्वस्त दरात घरे विकत घेऊन नंतर चढ्या दराने विक्री करण्याचा हा डाव असू शकतो.

मनपाकडून पोलीस तक्रार नाहीमहापालिकेच्या नावाने सोशल मीडियावर एक बोगस आॅर्डर धुमाकूळ घालत असतानाही प्रशासनाने पोलिसांकडे कोणतीही तक्रार दिली नाही. मनपाने तक्रार दिल्यास पोलीस सोशल मीडियावर आॅर्डर कोणी टाकली त्याचा शोध घेऊ शकतील. महापालिका प्रशासनाकडेच आजपर्यंत नागरिकांनी बोगस आॅर्डरसंदर्भात तक्रार केलेली नाही, हे विशेष. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाriverनदीfraudधोकेबाजी