शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद विद्यापीठाची अधिसभा निवडणूक पुढे ढकलल्याची सोशल मिडियावर अफवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 20:32 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. ही निवडणूक औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानुसार पुढे ढकलल्याच्या अफवा सोशल मिडियावर उठवल्या आहे.

ठळक मुद्देअधिसभा निवडणूक पुढे ढकलल्याची सोशल मिडियावर अफवाअफवा पसरविणा-यावर गुन्हे दाखल करापुढील सुनावणी शुक्रवारी (दि. २४) होणार

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. ही निवडणूक औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानुसार पुढे ढकलल्याच्या अफवा सोशल मिडियावर उठवल्या आहे. याविषयी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. साधना पांडे यांना विचारले असता, त्यांनी असा कोणताही निर्णय झालेला नसून, या अफवा असल्याचे सांगितले.विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्न झालेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यपकांना मतदानाचा अधिकार दिल्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. याविषयी बुधवारी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली आहे. यावर कोणाताही निर्णय झाला नसून, पुढील सुनावणी शुक्रवारी (दि. २४) होणार आहे. मात्र याच दिवशी मतदान आहे. याविषयी सोशल मीडियावर काही लोकांनी मेसेज टाकून औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने निवडणूक स्थगित झाली असून, निवडणुकीची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचे टाकले आहे. यामुळे शिक्षण वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याविषयी विद्यापीठाच्या कुलसचिव तथा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. साधना पांडे यांच्याशी संपर्क साधला असता,  त्यांनी या अफवा असल्याचे स्पष्ट केले. विद्यापीठाने निवडणूकीसाठी स्वतंत्रपणे पोर्टल तयार केलेले आहे. त्यावर देण्यात येणारी सूचना ही अधिकृत असते. त्यावर निवडणूक पुढे ढकलली किंवा काही बदल झाले याविषयी कोणतेही पत्र टाकण्यात आलेली नाही किंवा न्यायालयाने असा कोणाताही निकाल दिल्याचे विद्यापीठ प्रशासनापर्यंत पोहचलेले नसल्यामुळे पुर्वनियोजित वेळापत्रकानुसार निवडणूक होत आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही, असेही डॉ. पांडे यांनी स्पष्ट केले.अफवा पसरविणा-यावर गुन्हे दाखल कराविद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढे ढकलल्याची अफवा विद्यापीठ विकास मंचचे संस्थाचालक गटातील उमेदवार चंद्रकांत मुळे यांनी सोशल मिडियावर पोस्ट टाकून उठवली असल्याचा आरोप मुप्टाचे संस्थापक सचिव प्रा. सुनिल मगरे यांनी केला. एका उमेदवाराने न्यायलयाचा हवाला देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल विद्यापीठ प्रशासनाने मुळे यांच्यावर अफवा पसरविल्याचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. याविषयी उमेदवार चंद्रकांत मुळे यांना विचारले असता त्यांनी संबंधित मेसेज चुकीने पाठविण्यात आला असून, त्याबद्दल दिलगीर असल्याचे सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादuniversityविद्यापीठ