शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील आरटीओ निरीक्षकांची पळवापळवी; २१ निरीक्षक गेले, मिळाले फक्त एक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 18:32 IST

मराठवाड्यातून बदली होऊन गेलेल्या २१ निरीक्षकांच्या ठिकाणी आता कर्मचारी येण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.

ठळक मुद्देराज्यातील आरटीओ निरीक्षकांच्या १८५ जणांच्या बदल्या १५ लाख वाहनांसाठी १७ निरीक्षक

- संताेष हिरेमठऔरंगाबाद : कधी मराठवाड्याच्या हक्काचे पाणी पळविले जाते, तर कधी शैक्षणिक संस्था. आता तर मराठवाड्यातील आरटीओ निरीक्षकांचीही पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पळवापळवी केली जात आहे. राज्यात गेल्या महिनाभरात राज्यातील १८५ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. यात मराठवाड्यातून २१ निरीक्षक गेले. मात्र, त्या बदल्यात केवळ एक निरीक्षक मराठवाड्याला मिळाले.

औरंगाबादसह नांदेड, परभणी, हिंगोली, बीड येथील २१ निरीक्षकांच्या बारामती, मुंबई (मध्य), ठाणे, मुंबई (पश्चिम), पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, चंद्रपूर, सांगली, वर्धा, सातारा आदी ठिकाणी बदल्या करण्यात आल्या, तर लातूर येथून उमरगा येथे आणि उमरगा येथून लातूरला दोघांची बदली झाली. यात काही विनंतीनुसारही बदल्या करण्यात आल्या आहेत. १८५ जणांमध्ये वाशिम येथून एका मोटार वाहन निरीक्षकाची लातूर येथे बदली झाली; परंतु मराठवाड्यातून बदली होऊन गेलेल्या २१ निरीक्षकांच्या ठिकाणी आता कर्मचारी येण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. निरीक्षक नसल्याचा थेट परिणाम आरटीओ कार्यालयातील कामकाजावर होत आहे. अपुऱ्या निरीक्षकांच्या जोरावरच कामकाज करावे लागत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील मोटार वाहन निरीक्षक कार्यालयांपुरतेच राहत आहेत. रस्त्यांवर नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनांवर करवाईचा सगळा भार वाहतूक पोलिसांवर येत आहे.

१५ लाख वाहनांसाठी १७ निरीक्षकऔरंगाबाद जिल्ह्यातील वाहनांची संख्या १५ लाख ३१ हजारांवर गेली आहे. आरटीओ कार्यालयात मोटार वाहन निरीक्षकांची ३० पदे मंजूर आहेत. त्यामुळे आजघडीला १७ पदे भरलेली आहेत, तर १३ पदे रिक्त आहेत. निरीक्षकांअभावी आरटीओ कार्यालयास मिळालेली ३ अत्याधुनिक वाहने अजूनही कार्यालयातच उभी राहत आहेत.

सर्वसामान्य वाहनचालकांना फटकामराठवाड्यावर नेहमीच अन्याय केला जात आहे. आरटीओ कार्यालयातील रिक्त पदे भरली जात नाही. त्याचा फटका सर्वसामान्य वाहनचालकांना बसत आहे. लायसन्स मिळण्यासाठी दोन-दोन महिने प्रतीक्षा करावी लागते. शासनाने रिक्त पदे तर भरलीच पाहिजेत, बदली होऊन कर्मचारी गेल्यानंतर त्या जागी लगेच अन्य कर्मचारी पाठविले पाहिजेत.- किरण दळवी, सचिव, महाराष्ट्र मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटना

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाRto officeआरटीओ ऑफीस